“८ वर्षांपूर्वी प्रत्येक वर्षी २ कोटी नोकऱ्यांचं सांगितलं, तसंच आता १० लाख सरकारी नोकऱ्यांची वेळ”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 08:07 PM2022-06-14T20:07:22+5:302022-06-14T20:08:56+5:30
Rahul Gandhi over PM Modi : राहुल गांधींचा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा
Rahul Gandhi over PM Modi : रोजगार निर्मितीच्या माध्यमातून वाढती बेरोजगारी आणि आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थेला सरकार मोठा बूस्टर डोस देण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत माहिती दिली की सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून सरकारने पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये १० लाख लोकांची भरती करावी असे निर्देश दिले. दरम्यान, या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
“जसं आठ वर्षांपूर्वी तरूणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं, तसंच आता १० लाख सरकारी नोकऱ्यांची वेळ आहे. हे जुमल्यांचं नाही, ‘महा जुमल्यांचं’ सरकार आहे. पंतप्रधान नोकऱ्या निर्माण करण्यात नाही, तर बातम्या तयार करण्यात एक्सपर्ट आहेत,” असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
जैसे 8 साल पहले युवाओं को हर साल 2 करोड़ नौकरियों का झांसा दिया था, वैसे ही अब 10 लाख सरकारी नौकरियों की बारी है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 14, 2022
ये जुमलों की नहीं, 'महा जुमलों' की सरकार है।
प्रधानमंत्री जी नौकरियां बनाने में नहीं, नौकरियों पर 'News' बनाने में एक्सपर्ट हैं।
ट्वीटद्वारे माहिती
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लक्षावधी बेरोजगार युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारतर्फे पुढील दीड वर्षात १० लाख नोकऱ्या देण्यात येतील. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी एप्रिल महिन्यातही संबंधित उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी, नोकरी देण्यासंदर्भात चर्चा केली होती. तसेच, सरकारमधील रिक्त जागांवर लवकरात लवकर पदांची भरती करावी, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यातून, देशातील युवकांना नोकरीची चांगली संधी मिळेल.