Rahul Gandhi over PM Modi : रोजगार निर्मितीच्या माध्यमातून वाढती बेरोजगारी आणि आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थेला सरकार मोठा बूस्टर डोस देण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत माहिती दिली की सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून सरकारने पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये १० लाख लोकांची भरती करावी असे निर्देश दिले. दरम्यान, या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
“जसं आठ वर्षांपूर्वी तरूणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं, तसंच आता १० लाख सरकारी नोकऱ्यांची वेळ आहे. हे जुमल्यांचं नाही, ‘महा जुमल्यांचं’ सरकार आहे. पंतप्रधान नोकऱ्या निर्माण करण्यात नाही, तर बातम्या तयार करण्यात एक्सपर्ट आहेत,” असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.