Ram Mandir Bhoomi Pujan: अयोध्येत मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होताच राहुल गांधीचं ट्विट; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 02:20 PM2020-08-05T14:20:19+5:302020-08-05T14:21:15+5:30
Ram Mandir Bhoomi Pujan: पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन; मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत सोहळा संपन्न
नवी दिल्ली: राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या सोहळ्याला १७५ जण हजर होते. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोहळ्यासाठी अतिशय मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींनीदेखील राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 'राम प्रेम हैं. वे कभी घृणा में प्रकट नहीं हो सकते. राम करुणा हैं. वे कभी क्रूरता में प्रकट नहीं हो सकते. राम न्याय हैं. वे कभी अन्याय में प्रकट नहीं हो सकते', असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. तत्पूर्वी काल काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींनीदेखील राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम सर्वोत्तम मानवीय गुणों का स्वरूप हैं। वे हमारे मन की गहराइयों में बसी मानवता की मूल भावना हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 5, 2020
राम प्रेम हैं
वे कभी घृणा में प्रकट नहीं हो सकते
राम करुणा हैं
वे कभी क्रूरता में प्रकट नहीं हो सकते
राम न्याय हैं
वे कभी अन्याय में प्रकट नहीं हो सकते।
अयोध्येत मोदींच्या हस्ते राम मंदिराचा शिलान्यास
अयोध्येत पंतप्रधान मोदींनी राम मंदिरासाठी भूमिपूजन केलं. त्यांनी एकूण ९ शिळांचं पूजन केलं. यावेळी कूर्म शिळा मध्यभागी ठेवण्यात आली होती. याच शिळेवर रामलला विराजमान होणार आहेत. जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या जयघोषात शिलान्यासाचा कार्यक्रम संपन्न झाला. १२ वाजून ४४ मिनिटांनी भूमिपूजन सोहळा पार पडला.
#WATCH: #RamTemple 'Bhoomi Pujan' concludes at #Ayodhya.
— ANI (@ANI) August 5, 2020
Soil from more than 2000 pilgrimage sites and water from more than 100 rivers was brought for the rituals. pic.twitter.com/DRpoZEKYWw
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९ शिळांचं पूजन करण्यात आलं. या शिळांचं महत्त्व पुजाऱ्यांनी सांगितलं. '१९८९ मध्ये जगभरातल्या भाविकांनी मंदिरासाठी विटा पाठवल्या होत्या. अशा २ लाख ७५ हजार विटा अयोध्येत आहेत. त्यातल्या १०० विटांवर जय श्रीराम लिहिण्यात आलं आहे. त्यातल्याच ९ विटा आज इथे आणण्यात आल्या आहेत,' अशी माहिती पुजाऱ्यांनी भूमिपूजन सुरू असताना दिली.
रामजन्मभूमीला भेट देणारे पहिले पंतप्रधान
नरेंद्र मोदी तब्बल २८ वर्षांनी अयोध्येत आले आहेत. याआधी ते राम जन्मभूमी आंदोलनावेळी अयोध्येत आले होते. त्यानंतर जवळपास तीन दशकांनी मोदी अयोध्येत आले. श्रीराम जन्मभूमीचं दर्शन घेणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. याआधी देशाच्या कोणत्याही पंतप्रधानानं अयोध्येतल्या हनुमानगढीचं दर्शन घेतलं नव्हतं. त्यामुळे हनुमानगढीला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरण्याचा मान मोदींना मिळाला आहे.