नवी दिल्ली: राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या सोहळ्याला १७५ जण हजर होते. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोहळ्यासाठी अतिशय मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींनीदेखील राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 'राम प्रेम हैं. वे कभी घृणा में प्रकट नहीं हो सकते. राम करुणा हैं. वे कभी क्रूरता में प्रकट नहीं हो सकते. राम न्याय हैं. वे कभी अन्याय में प्रकट नहीं हो सकते', असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. तत्पूर्वी काल काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींनीदेखील राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
Ram Mandir Bhoomi Pujan: अयोध्येत मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होताच राहुल गांधीचं ट्विट; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 2:20 PM