Rahul Gandhi Twitter : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ट्विटरनं मोठा धक्का दिला आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केला होता. त्यावर भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ट्विट हटवलं होतं. पण आता त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं सस्पेंड करण्यात आलं होतं.
एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर होत असल्यानं फोटोवर आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पीडितेच्या आईवडिलांचा फोटो शेअर केला आहे. यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार वकील विनीत जिंदल यांनी केली होती.
ट्विटरकडून आता राहुल गांधी यांचं थेट ट्विटर अकाऊंटच सस्पेंड करण्यात आल्यानंतर राहुल गांधी यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान, काही वेळानंतर राहुल गांधींच ट्विटर अकाऊंट पूर्ववत करण्यात आलं. पण ते नेमकं सस्पेंड का करण्यात आलं होतं याची चर्चा आता सुरू झाली आहे. काँग्रेसकडून ट्विटरला उत्तर पाठविण्यात आल्यानंतर राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट पूर्ववत करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.