नवी दिल्ली :काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला आहे. त्यांनी, एक व्हिडिओ शेअर करत सरकारने मोठ्या बँक डिफॉल्टर्सची नावे लपवल्याचा आरोप केला आहे. संसदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी, आता खुद्द रिझर्व बँकेनेच नीरव मोदी, मेहुल चोकसींसह भाजपाच्या मित्रांची नावे बँकेचे कर्ज बुडवणाऱ्यांच्या यादीत टाकली असल्याचे म्हटले आहे.
ट्विट करत राहुल गांधी म्हणाले, 'मी संसदेत एक सरळ प्रश्न विचारला होता - मला देशातील 50 सर्वात मोठ्या बँक चोरांची नावे सांगा. अर्थमंत्र्यांनी नावे सांगण्यास नकार दिला. आता आरबीआयने नीरव मोदी, मेहुल चोकसींसह भाजपाच्या ‘मित्रां’ची नावे बँक चोरांच्या यादीत टाकली आहेत. यामुळेच संसदेत हे सत्य लपवण्यात आले.
CoronaVirus: 'त्या' अफवेमुळे इराणमध्ये हाहाकार; 728 जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले अंध
कोरोना पसरवणारेच स्वत:ला 'कोरोना वॉरियर्स' म्हणतायेत, 'या' केंद्रीय मंत्र्याचा तबलिगींवर निशाणा
मार्च महिन्यात झालेल्या बजेट सत्रात राहुल गांधी यांनी लोकसभेत बँकिंग फ्रॉडचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी सरकारकडे देशातील सर्वात मोठ्या 50 डिफॉल्टर्सची माहिती मागितली होती. हा प्रश्न त्यांनी प्रश्नोत्तराच्या काळात केला होता. 'मी सरकारला अत्यंत सोपा प्रश्न विचारला. देशातील 50 डिफॉल्टर कोण आहेत. मला कसल्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही. पंतप्रधान मोदी म्हणतात, ज्यांनी भारतीय बँकांमध्ये चोरी केली, मी त्यांना पकडून परत आणीन. तर मी सरकारला त्यांची नावे विचारली. मला उत्तर मिळाले नाही,' असेही राहुल गांधी यांनी म्हटलो होते.
किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!
यासंदर्भात उत्तर देताना, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकुर म्हणाले होते, यात लपवण्याचा काही संबंधच नाही. याची माहिती देण्यात आली आहे. सीआयसीच्या वेबसाईटवर सर्व विलफुल डिफॉल्टर्सची नावे आहेत. 25 लाखहून अधिक सर्व जणांची माहिती दिली जाते. अनुराग ठाकुर यांच्या या उत्तरामुळे संसदेत जबरदस्त गदारोळ झाला होता.