शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

महाराष्ट्रात आम्ही 'डिसीजन मेकर' नाही; राहुल गांधींनीही सांगितली (पृथ्वी)राज की बात!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 2:54 PM

यापूर्वी,  काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका अशाच प्रकारच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात, ‘मी मंत्रिमंडळात नाही. सरकारपण आमचे नाही. हे सरकार शिवसेनेचे आहे,’ असे चव्हान यांनी म्हटले होते.

ठळक मुद्देआमचा महाराष्ट्र सरकारला केवळ पाठिंबा आहे. आम्ही तेथील 'डिसीजन मेकर' नाही," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी बोलत होतेयापूर्वी,  काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका अशाच प्रकारच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि देशात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले आहे." आमचा महाराष्ट्र सरकारला केवळ पाठिंबा आहे. आम्ही तेथील 'डिसीजन मेकर' नाही," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

यापूर्वी,  काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका अशाच प्रकारच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात, ‘मी मंत्रिमंडळात नाही. सरकारपण आमचे नाही. हे सरकार शिवसेनेचे आहे,’ असे चव्हान यांनी म्हटले होते.

मोदी सरकारचे शक्तीशाली चीनला 30 दिवसांत 3 मोठे धक्के, संपूर्ण जगच गेलंय 'ड्रॅगन'च्या विरोधात यावेळी एका पत्रकाराने महाराष्ट्रातील सध्यस्थितीचा उल्लेख करत राहुल गांधी यांना प्रश्न केला होता, की देशातील अक तृतियांश कोरोनाबाधित महाराष्ट्रात आहेत. तेथील सरकारमध्ये तुम्ही सहभागी आहात. मुंबईत महाराष्ट्राच्या आर्ध्याहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रानेही राज्यात लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे वाटते का? कारण तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. 

जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा

पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, देशातील दिल्ली, मुंबई आणि पुणे यांसारख्या मोस्ट कनेक्टेड शहरांमध्येच कोरोना वाढत आहे, असे आपल्याला दिसून येईल. मी आपल्याला एक फरक सांगू इच्छितो, की आमचा महाराष्ट्र सरकारला केवळ पाठिंबा आहे. मात्र, आम्ही तेथील 'डिसिजन मेकर' नाही. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान आणि पदुच्चेरी येथे डिसिजन मेकर आहोत. हा सरकार चालवण्यामधला आणि सरकारला पाठिंबा असण्यामधील फरक आहे. तथापी, महाराष्ट्र त्याच्या कनेक्टिव्हिटीमुळे संघर्ष कारत आहे. मुंबई देशातील एक आर्थिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबईला पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करायला हवे. मला जाणीव आहे, की महाराष्ट्र एक अत्यंत कठीन लढाई लढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला पूर्ण तागदीनिशी सहकार्य करणे आवश्यक आहे."

CoronaVirus News: कोरोनाचा कहर वाढला; 'हे' 25 जिल्हे ठरतायत देशाची डोकेदुखी, महाराष्ट्रातील तब्बल 6 जिल्ह्यांचा समावेश

आम्हाला माहिती आहे, पुढे काय करायला हवे -काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, आमचे सरकार गरिबांना पैसे आणि भोजन देत आहे. आम्हाला माहिती आहे, की पुढे काय करायला हवे. पण राज्ये किती काळ एकटेच लढाई लढतील. केंद्रालाही पुढे यावे लागेल आणि नियोजनासंदर्भात देशाशी बोलावे लागेल.

CoronaVirus News : चिंताजनक! सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जगातील टॉप 10 देशांमध्ये पोहोचला भारत, इराणला टाकले मागे

आता सरकार पुढे काय करणार? -पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते, की आपण 21 दिवसांत कोरोना व्हायरसवर मात करू, मात्र आता 60 दिवस झाले आहेत. आता तर देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे.  लॉकडाउनही काढला जात आहे. लॉकडाउनचा हेतू पूर्णपणे फेल गेला आहे. आता सरकार पुढे काय करणार ? असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईdelhiदिल्लीPuneपुणेcongressकाँग्रेसIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस