नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी हे तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आपण टीआरएस, भाजपा आणि एमआयएमला निवडणुकीत आव्हान देण्यासाठी आल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावरून आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "हिंमत असेल तर हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवा" असं म्हणत चॅलेंज दिलं आहे. तसेच राहुल गांधींवर (Congress Rahul Gandhi) निशाणा साधला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी "राहुल गांधी केरळच्या वायनाडमध्येही हरणार आहेत. हिंमत असेल तर या आणि हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवा, नाहीतर मेडकमधून नशीब आजमावून पाहा. पण तुम्ही वायनाडमध्ये हरणार आहात" असा सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी तेलंगणा दौऱ्यावर असताना आपण टीआरएस, भाजपा आणि एमआयएमला निवडणुकीत आव्हान देण्यासाठी आल्याचं विधान केलं होतं. त्याला आता ओवेसींनी प्रत्युत्तर देत जाहीर आव्हान दिलं आहे.
"मुझे क्या बोलना है?", शेतकरी रॅलीआधीचा राहुल गांधींचा 'तो' Video भाजपाने केला शेअर
भाजपा नेते अमित मालवीय (BJP Amit Malviya) यांनी राहुल गांधींचा एक व्हिडीओ शेअर करत जोरदार हल्लाबोल केला आहे. तेलंगणात शेतकरी रॅली सुरू होण्याआधीचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये राहुल गांधीकाँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. मात्र, यादरम्यान आजचा विषय काय? मला नेमकं काय बोलायचं आहे? असा प्रश्न राहुल सहकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरून याबाबत एक ट्विट करत व्हिडीओ शेअर केला आहे.
"जेव्हा तुम्ही वैयक्तिक परदेशी सहली आणि नाईट क्लबिंगच्यामध्ये राजकारण करता तेव्हा असं होतं" असा सणसणीत टोला देखील अमित मालवीय यांनी राहुल गांधींना लगावला आहे. राहुल गांधी दोन दिवसीय दौऱ्यासाठी तेलंगणा येथे आले आहेत. त्यावेळी ते एका खोलीत काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत बसले होते. राज्यातील शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाआधीचा हा व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये राहुल इतर कार्यकर्त्यांना मला नेमकं काय बोलायचं आहे हे विचारत आहेत. 17 सेकंदाच्या या व्हि़डीओ क्लीपमध्ये राहुल गांधी हे खुर्चीवर बसले असून इतरांना आजचा मुख्य विषय काय आहे, मला नेमकं काय बोलायचं आहे ते विचारत आहेत. यावरूनच भाजपाने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.