Coronavirus : शहरांनंतर आता ग्रामीण भागही ‘परमात्मा निर्भर’; राहुल गांधींची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 06:12 PM2021-05-09T18:12:23+5:302021-05-09T18:14:48+5:30
शहरांनंतर ग्रामीण भागातही पसरत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव
देशात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशातच काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ग्रामीण भागात पसरत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावावरून बोचरी टीका केली आहे. यापूर्वीही राहुल गांधींनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.
शहरांनंतर आता ग्रामीण भागही ‘परमात्मा निर्भर’, असं म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून एका वृत्ताची हेडलाईन शेअर करत यावर टीका केली आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोरोनाच्या परिस्थितीतवरु टीका केली होती.
शहरों के बाद, अब गाँव भी परमात्मा निर्भर! pic.twitter.com/KvJxN6fRIU
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 9, 2021
देश को PM आवास नहीं, सांस चाहिए! pic.twitter.com/jvTkm7diBm
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 9, 2021
यापूर्वी काय म्हणाले होते राहुल गांधी?
देशाला पीएम आवास नव्हे, श्वास पाहिजे, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केले होतं. या ट्वीटसोबत त्यांनी दोन फोटो शेअर केले होते. एका फोटोत इंडिया गेट आहे. त्या ठिकाणी खोदकाम केलेलं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत लोक तोंडाला मास्क लावून रिकामे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन ऑक्सिजनसाठी रांगेत उभे असलेले दिसत आहेत. तसंच त्यापूर्वी देशातील कोरोना परिस्थितीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं होतं. देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात असल्याचे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींना सल्ला दिला होता. तसेच सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध करून देण्याची विनंती देखील राहुल गांधींनी पंतप्रधानांना केली होती.