काँग्रेसचे माजी मंत्री राजा पटेरिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी त्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पटेरिया यांना मध्य प्रदेशातील दमोह येथील हट्टा येथून पहाटे साडेपाच वाजता अटक करण्यात आली.त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता.
या व्हिडिओमध्ये ते कथितपणे 'पीएम मोदींना मारण्याबाबत' बोलताना दिसत होते. मात्र, नंतर पटेरिया यांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते. पुढच्या निवडणुकीत मोदींचा पराभव करायचा आहे, असे ते म्हणाले होते. बोलताना ते प्रवाहात घडल्याचे त्यांनी सांगितले होते.
काँग्रेस नेते राजा पटेरिया यांचा समोर आलेल्या व्हिडिओत त्यांच्या समोर कार्यकर्ते असल्याचे दिसत आहे. यात ते कार्यकर्त्यांना संबोधित करत असल्याचे दिसत आहे."मोदी निवडणुका संपवतील, मोदी धर्म, जात, भाषेच्या आधारावर फूट पाडतील, दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांचे जीव धोक्यात, संविधान वाचवायचे असेल तर मोदींना मारायला तयार राहा, असे ते म्हणताना दिसत आहेत. यानंतर त्यांनी या टिप्पणीवर हत्या म्हणजे पराभव असल्याचे म्हटले आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते राजा पटेरिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुढील निवडणुकीत भाजपला हरवायचे आहे. ते बोलत असताना माझ्याकडून प्रवाहात घडले. पण हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने हा भाग व्हारल केला. हा व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. मला असे म्हणायचे नव्हते. माझ्या विधानाचा विपर्यास करून मांडण्यात आला आहे, असंही राजा पटेरिया म्हणाले.