"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 06:20 PM2024-09-30T18:20:06+5:302024-09-30T18:20:31+5:30
"भाजप ब्राह्मण विरोधी आहे आणि ब्राह्मणांना मारून योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा उंचावली आहे," असे रणदीप सिंह सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर या आरोपांची तीव्रताही सातत्याने वाढताना दिसत आहे. यातच, कॅथल येते आयोजित ब्राह्मण समाज सम्मेलनातून काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. "भाजप ब्राह्मण विरोधी आहे आणि ब्राह्मणांना मारून योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा उंचावली आहे," असे रणदीप सिंह सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
सुरजेवाला म्हणाले, सर्वांनाच माहीत आहे, या देशाचे नेतृत्व उत्तर प्रदेश या सर्वात मोठ्या प्रांतातून येते. यामुळे आदित्यनाथांना जिवंत ठेवायचे असेल तर ब्राह्मण समाजाला मारावे लागेल. त्यांनामारून त्यांना राजकीयदृष्ट्या मारून योगी आदित्यनाथांची प्रतिमा उंचावली. यांचे नावही आदित्यनाथ खरे नाही. मी एकदा म्हणालो होतो की, आपले नाव तर खरे सांगा. केवळ भगवा धारण करून कुमी भगव्याच्या लायक होत नाही, अशेही सुरजेवाला यावेोली म्हणाले.
भाजपा की सच्चाई ये है कि
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) September 29, 2024
कोई ऐसा सगा नही
जिसे बीजेपी ने ठगा नही।
हरियाणा में तो ब्राह्मण समाज पर अत्याचार तो हुए ही, हमारे पड़ोसी राज्य उत्तर प्रदेश में योगी सरकार में ब्राह्मणों का उत्पीड़न हर जिले के दास्तां है। pic.twitter.com/gfJy6J9RGT
सुरजेवाला पुढे म्हणाले, हरियाणातर ब्राह्मण समाजावर अत्याचार झालेच आहेत. उत्तर प्रदेशातील योगी सरकारमध्येही ब्राह्मणांवर अत्याचार झाले. आखिर यूपीचे ब्राह्मण नेतृत्व कुोटे आहे? तेथे भाजपने निवडून निवडून लोकांना नाकारले आहे.