सचिन पायलट भाजपाच्या संपर्कात, 19 आमदारांच्या समर्थनाचा दावा; मोठा निर्णय घेण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 07:48 PM2020-07-12T19:48:30+5:302020-07-12T19:57:55+5:30
काँग्रेस अशोक गहलोत यांच्यावर नाराज आहे. कारण आमदाराच्या घोडे बाजार प्रकरणात सचिन पायलट यांना चौकशीची नोटिस बजावण्यात आली होती.
जयपूर -राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावरील संकट आणखीनच गडद होताना दिसत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पायलट (Sachin Pilot) सध्या दिल्लीत आहेत आणि ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी त्यांच्याकडे 16 काँग्रेस आणि 3 अपक्ष आमदारांचे समर्थन असल्याचा दावाही केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाकडून सांगण्यात आले आहे, की सर्वप्रथम राजस्थानातीलअशोक गहलोत सरकार पाडा. मात्र, भाजपाने त्यांना मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला आहे. कारण राज्यस्थानात नेतृत्वासंदर्भात भाजपांतर्गतही समस्या आहेत. वसुंधरा राजे यांच्या समर्थनात 45 आमदार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली असून त्यांना समजावले आहे.
काँग्रेस अशोक गहलोत यांच्यावर नाराज आहे. कारण आमदाराच्या घोडे बाजार प्रकरणात सचिन पायलट यांना चौकशीची नोटिस बजावण्यात आली होती. तसेच आपण भाजपात जाणार नाही याचेही सचिन पायलट यांनी संकेत दिले आहेत. मात्र, ते आपला नवा पक्ष नक्कीच तयार करू शकतात. सचिन पायलट हे चौकशीची नोटिस जारी झाल्यापासून नाराज आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसरा, लॉकडाउनपूर्वी सचीन पायल यांची जोतिरादित्य शिंदे यांच्याशी बरीच चर्चा सुरू होती. भाजपानेही राज्यसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात खेळी खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना यश आले नव्हते. मात्र, आता सचिन पायलट यांनी मोठा निर्णय घेण्याची पूर्ण तयारी केली आहे. तत्पूर्वी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत शनिवारी पत्रकार परिषद घेऊन म्हणाले होते, त्यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आमदारांना अमिष दाखवले जात आहे.
असाच आरोप राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या वेळी करण्यात आला होता. यानंतर चौकशीसाठी मुख्यमंत्री गहलोत यांनी एसओजीची स्थापनाही केली होती. यानंतर एसओजीने 3 अपक्ष आमदारांना चौकशी साठीही बोलावले होते. याच दरम्यान 10 जूनला उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांनाही समन पाठवण्यात आले होते. तेव्हापासून सचिन पायलट नाराज आहेत.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : आता उत्तर प्रदेशात लॉकडाउनचा नवा फॉर्म्युला, असा आहे योगी सरकारचा 'प्लॅन'
CoronaVirus : मोलकरणीच्या नावानं पाठवलं पत्नीचं Corona सॅम्पल, रिपोर्ट आला पॉजिटिव्ह!; मग...
धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा
ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर