शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

काँग्रेसला मोठा धक्का, गांधी कुटुंबाच्या निकटवर्तीय नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 3:54 PM

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि राहुल गांधी यांनी तडकाफडकी दिलेल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेली काँग्रेसची घसरण सुरूच आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि राहुल गांधी यांनी तडकाफडकी दिलेल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेली काँग्रेसची घसरण सुरूच आहे. दरम्यान, आज काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून, गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेले उत्तर प्रदेशातील नेते संजय सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. संजय सिंह यांनी आज पक्ष सदस्यत्व आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी संजय सिंह यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी याची माहिती सभागृहात दिली. 

आज राज्यसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते संजय सिंह यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यसभेतील मतांचे गणितही बदलणार आहे. आता संजय सिंह हे बुधवारी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आपली दुसरी पत्नी अमिता सिंह ही सुद्धा लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देईल, असा दावा सिंह यांनी केला आहे. संजय सिंह यांची पहिली पत्नी गरिमा सिंह अमेठी विधानसभा मतदारसंघातून भाजपा आमदार आहे. संजय सिंह हे राहुल गांधी यांचे विश्वासू मानले जात.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संजय सिंह यांनी सुल्तानपूर लोकसभा मतदारसंघातून मनेका गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या संजय सिंह यांना काँग्रेसने आसाममधून राज्यसभेवर पाठवले होते. 1980 मध्ये जेव्हा संजय गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा संजय सिंह यांनी त्यांना पाठिंबा दिला होता.  अमेठी मतदारसंघात भक्कम जनाधार असलेल्या संजय सिंह यांनी याआधीही एकदा काँग्रेस पक्ष सोडला होता. मात्र यावेळी आपण पूर्ण विचार करून पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. ''गेल्या 15-20 वर्षांपासून काँग्रेसमध्ये विसंवादाची स्थिती निर्माण झाली आहे. आज घडीला संपूर्ण देश मोदींसोबत उभा आहे. त्यामुळे जर देश मोदींसोबत असेल तर मीसुद्धा त्यांच्यासोबत आहे. मी उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे मी काँग्रेसचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.''

 दरम्यान, संजय सिंह यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेचे संख्याबळ 240 पवर आले आहे. 245 सदस्य असलेल्या या सभागृहातील चार जागा आधीच रिक्त होत्या. त्यात आला अजून एका जागेची भर पडली आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाPoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेश