नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर गेले आहेत. कोरोना संकटाच्या काळातील पंतप्रधान मोदींचा पहिलाच परदेश दौरा आहे. सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता, तेव्हा अटक होऊन तुरुंगवासही भोगला होता, असे म्हटले. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, काँग्रेसकडून थेट माहिती अधिकाराअंतर्गत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात माहिती मागवण्यात आली आहे. (congress leader saral patel filed rti on pm modi bangladesh satyagraha statement)
गुजरातमधील काँग्रेसचे सोशल मीडिया नॅशनल कनव्हेअर असणाऱ्या सरल पटेल यांनी RTI दाखल केला आहे. यासंदर्भातील माहिती पटेल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशमध्ये केलेल्या दाव्यासंदर्भात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज केल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.
या संदर्भात जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे
पंतप्रधान कार्यालयाकडे मोदींनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान केलेल्या दाव्यासंदर्भातील अधिक माहिती मागवणारा आरटीआय अर्ज केला. मला या संदर्भात जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. कोणत्या कायद्याअंतर्गत मोदींनी अटक करण्यात आली. त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले, हे मला जाणून घ्यायचे आहे. तुम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल ना?, असे ट्विट सरल पटेल यांनी केले आहे.
‘त्या’ वक्तव्यावरुन शशी थरूर यांनी मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी
पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?
बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होते. यावेळी मला अटक होऊन तुरुंगवासही भोगावा लागला होता, अशी आठवण पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना सांगितली.
‘‘भारतीय जनतेचा बांगलादेश निर्मितीला पाठिंबा होता, तर मोदींनी सत्याग्रह का केला?’’
सत्याग्रह करण्याची काय गरज होती?
सन १९७१ मध्ये भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेने केलेल्या विरोधाचा सामना करूनही बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. सर्व भारतीय एकाच मताचे होते तर सत्याग्रह करण्याची काय गरज होती आणि यासाठी कोणाला अटक का केली जाईल? मला खात्री आहे की १९७१ संदर्भात आपल्याला लवकरच नवीन माहिती मिळेल, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.