बिहारचे मुख्यमत्री तथा जनता दल (युनायटेड) प्रमुख नीतीश कुमार रविवारी सकाळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत विरोधकांची आघाडी असलेल्या INDIA ब्लॉकमधून बाहेर पडले आणि सयंकाळी भाजप प्रणित NDA आघाडीच्या साथाने नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या संपूर्ण घडामोडीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. यात त्यांनी नितीश यांच्यासाठी 'स्नॉलीगोस्टर' असा शब्द वापरला आहे. याचा अर्थ 'धूर्त आणि सिद्धांतहीन राजकीय नेता' असा होतो.
काय म्हणाले थरून -थरूर यांनी आपली 2017 ची सोशल मीडियापोस्ट शेअर केली आहे. तेव्हा नितीश बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि कँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘महाआघाडी’तून बाहेर पडले होते आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा)सोबत हात मिळवणी केला होती.
थरूर यांनी 2017 च्या आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते, ‘आजचा शब्द! ‘स्नोलीगोस्टर’ अमेरिकेत याचा अर्थ एक ‘धूर्त, सिद्धांतहीन राजकीय नेता’ असा होतो. पहिल्यांदा या शब्दाचा ज्ञत उपयोग 1845 मध्ये केला गेला होता आणि सर्वात अलिकडे याचा उपयोग 26/7/2017 मध्ये झाला आहे.’ काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी रविवारी आपील्या या जुन्या पोस्टला टॅग करत, ‘एक्स’वर म्हटले आहे आहे की, ‘या शब्दाचा आणखी एक दिवस वापर होईल, असे वाटले नव्हते – स्नोलीगोस्टर.’ थरूर कठीन इंग्रेजी शब्द सातत्याने सोशल मीडियावर शेअर तकरत असतात. यापूर्वीही त्यांनी ‘स्नोलीगोस्टर’ शब्दाचा वापर केला आहे.
2017 मध्ये केलं होतं असं Tweet -थरूर यांनी 2017 मध्येही, जेव्हा नितीस भाजपमध्ये गेले होते, तेव्हाही या शब्दाचा वापर केला होता. यानंतर त्यांनी, जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी प्रत्येकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, तेव्हा या शब्दाचा वापर केला होता.