नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला होता. त्यावरुन बराच वादंग माजला. यावरुन आता काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी मोदींवर निशाणा साधला. देश जन्माला आल्यानंतर जन्मलेले मोदी राष्ट्रपिता कसे होऊ शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांनी त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. त्यांनी मोदींचा उल्लेख 'फादर ऑफ इंडिया' असा केला. त्यावर शशी थरुर यांनी भाष्य केलं. 'भारताचा जन्म १९४७ मध्ये झाला आणि मोदींचं जन्मवर्ष १९४९ किंवा १९५० आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना बहुधा याची कल्पना नसावी. मुलाच्या जन्मानंतर वडिलांचा जन्म होणं अवघड आहे,' अशा शब्दांमध्ये थरुर यांनी जोरदार टोला लगावला आहे.
देश जन्मल्यानंतर जन्माला आलेले मोदी राष्ट्रपिता कसे?; शशी थरुर यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 9:25 AM