Quomodocunquize: शशी थरूर यांचा आणखी एक ‘वर्ड वार’, रेल्वे मंत्रालयाला घेरलं; माहितीये याचा अर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 12:47 PM2022-05-23T12:47:56+5:302022-05-23T12:48:28+5:30

काँग्रेसचे नेते शशी थरूर अनेकदा इंग्रजीच्या कठीण शब्दांचा वापर करताना दिसतात. Quomodocunquize या शब्दाचा वापर करून त्यांनी रेल्वेवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे.

congress leader shashi tharoor quomodocunquize railway ministry senior citizens concession tweet after coronavirus pandemic restrictions lifted | Quomodocunquize: शशी थरूर यांचा आणखी एक ‘वर्ड वार’, रेल्वे मंत्रालयाला घेरलं; माहितीये याचा अर्थ?

Quomodocunquize: शशी थरूर यांचा आणखी एक ‘वर्ड वार’, रेल्वे मंत्रालयाला घेरलं; माहितीये याचा अर्थ?

Next

Quomodocunquize Shashi Taroor: ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत बंद केल्याबद्दल काँग्रेस नेते शशी थरूर यांनी भारतीय रेल्वेवर निशाणा साधला आहे. शशी थरूर यांनी रेल्वेला टॅग करताना उच्चारण्यासही कठीण असलेल्या एका शब्द वापरला वापरला. हा शब्द क्वचितच कोणी ऐकला असेल. शशी थरूर यांनी रविवारी रेल्वेला टॅग करत ट्विटमध्ये Quomodocunquize हा शब्द वापरला आहे.

खुद्द शशी थरूर यांनीच त्याचा अर्थ सांगितला आहे. त्याच ट्वीटमध्ये शशी थरूर यांनी असेही सांगितलं आहे की, Quomodocunquize म्हणजे प्रत्येक संभाव्य मार्गाने पैसे कमवणे.  "अस्पष्ट शब्द विभाग: भारतीय रेल्वेने Quomodocunquize करावं का?,” असं ट्वीट थरूर यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडललाही टॅग केले आहे.


त्यांनी आपल्या या ट्वीटमध्ये 'SeniorCitizensConcession' असा हॅशटॅग वापरला आहे. रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यात येत होती. परंतु मार्च २०२० पासून ती बंद आहे. ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत सरकारनं कोरोना महासाथीच्या लॉकडाऊननंतर बंद केली होती. परंतु आता परिस्थिती सामान्य झाल्यापासून पुन्हा ही सवलत सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.

Web Title: congress leader shashi tharoor quomodocunquize railway ministry senior citizens concession tweet after coronavirus pandemic restrictions lifted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.