Quomodocunquize Shashi Taroor: ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत बंद केल्याबद्दल काँग्रेस नेते शशी थरूर यांनी भारतीय रेल्वेवर निशाणा साधला आहे. शशी थरूर यांनी रेल्वेला टॅग करताना उच्चारण्यासही कठीण असलेल्या एका शब्द वापरला वापरला. हा शब्द क्वचितच कोणी ऐकला असेल. शशी थरूर यांनी रविवारी रेल्वेला टॅग करत ट्विटमध्ये Quomodocunquize हा शब्द वापरला आहे.
खुद्द शशी थरूर यांनीच त्याचा अर्थ सांगितला आहे. त्याच ट्वीटमध्ये शशी थरूर यांनी असेही सांगितलं आहे की, Quomodocunquize म्हणजे प्रत्येक संभाव्य मार्गाने पैसे कमवणे. "अस्पष्ट शब्द विभाग: भारतीय रेल्वेने Quomodocunquize करावं का?,” असं ट्वीट थरूर यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडललाही टॅग केले आहे.