नवीन आयकर पोर्टलमधील तांत्रिक अडचणींवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ४,२०० कोटी रुपये खर्च करूनही सरकारला पोर्टल वापरकर्त्यांसाठी सोपं आणि अत्याधुनिक बनवता आलं नाही आणि समस्या निर्माण झाल्या असा आरोप शशी थरूर यांनी केला.
"यापूर्वीचं पोर्टल चांगलं चालत होतं तर या नव्या पोर्टलची गरज ताय होती?," असा सवाल थरूर यांनी सरकारला केला. काँग्रेसच्या अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेसशी निगडीत काही चार्टर्ड अकाऊंटंट यांनी आयकर पोर्टलमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे समस्य़ा निर्माण झाल्याची माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच लॉग इन करण्यासही सामान्य वेळापेक्षा अधिक वेळ लागत असल्याचं सांगण्यात आल्याचं थरूर म्हणाले.
नव्या पोर्टलची गरज काय?ज्यावेळी नवं पोर्टल योग्यरित्या सुरू होतं तर अशा परिस्थितीत नव्या पोर्टलची गरज काय होती? हा बदल अशावेळी करण्यात आला जेव्हा सामान्यत: करदाते आपला रिटर्न फाईल करतात किंवा रिफंडची मागणी करतात. हे सर्वासाठी उपलब्ध करून देण्यापूर्वी याची चाचणी का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी केला. "वापरकर्त्यांसाठी अधिक योग्य, अत्याधुनिक पोर्टल तयार करणं हा यामागील उद्देश होता. ४,२०० कोची रूपये खर्च करून सरकारला असं करता आलं आणि समस्या निर्माण केली," असंही थरूर म्हणाले.