२ फेब्रुवारीला मंत्र्याचे एक, ७ फेब्रुवारीला दुसरेच; काँग्रेस नेत्याने केली मोदींच्या कोरोना पसरविण्याच्या दाव्याची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 07:50 PM2022-02-07T19:50:07+5:302022-02-07T19:51:33+5:30

महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता.

congress leader sinivas bv shared video bjp minister 63 lacs workers went their house through train modi said corona spread by congress | २ फेब्रुवारीला मंत्र्याचे एक, ७ फेब्रुवारीला दुसरेच; काँग्रेस नेत्याने केली मोदींच्या कोरोना पसरविण्याच्या दाव्याची पोलखोल

२ फेब्रुवारीला मंत्र्याचे एक, ७ फेब्रुवारीला दुसरेच; काँग्रेस नेत्याने केली मोदींच्या कोरोना पसरविण्याच्या दाव्याची पोलखोल

Next

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसच्या पराभवांचे वाभाडे काढले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत होते. तेव्हा त्यांनी काँग्रेसने कोरोना काळात हद्द पार केल्याचा आरोप केला. काँग्रेसनंच देशभरात कोरोना पसरविल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असं मोदी म्हणाले. यावरून आता कांग्रेसनं मोदींवर निशाणा साधला.

युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही श्रमिक ट्रेन चालवल्या आणि ६३ लाख श्रमिकांना घरी पोहोचवण्याचं काम केल्याचं मोदी सरकारमधील मंत्री बोलत असल्याचं दिसत आहे. हा दावा त्यांनी २ फेब्रुवारी रोजी संसदेत केल्याचंही श्रीनिवास बी. व्ही. यांनी म्हटलं आहे.

 
काय म्हणाले होते मोदी?
पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. काँग्रेसवाले ही परिस्थिती कशी बिघडेल याची वाट पाहत होते. जेव्हा डब्ल्यूएचओ सांगत होते की लोकांनी आहे तिथेच थांबावे, जगाला हा संदेश दिला जात होता. परंतु काँग्रेसने तेव्हा हद्द पार केली, महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीतही गाड्यांवर माईक लावून लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी सांगितले जात होते, असा आरोप मोदी यांनी केला. 

कोरोनामुळे परिस्थिती बिघडविण्याची योजना होती. नरेंद्र मोदी कसा सामोरा जाणार, अपयशी होणार असा त्यांचा प्लॅन होता. म्हणून मुंबईच्या स्टेशनवर श्रमिकांची गर्दी जमविण्यात आली. युपी, बिहारच्या लोकांना पाठविण्यात आले. सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यात आल्याचा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला.

Web Title: congress leader sinivas bv shared video bjp minister 63 lacs workers went their house through train modi said corona spread by congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.