नाचणाऱ्या महिलेवर काँग्रेस नेत्याने केली पैशांची उधळण; नोटांचा वर्षाव करतानाचा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 02:16 PM2023-03-09T14:16:11+5:302023-03-09T14:17:04+5:30
काँग्रेसची संस्कृती दिसून येते आणि या लज्जास्पद घटनेबद्दल काँग्रेसने माफी मागावी.
कर्नाटकमध्ये एका लग्न समारंभात नाचणाऱ्या महिलेवर काँग्रेसच्या नेत्याने नोटांचा वर्षाव केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्हिडिओवरून राजकारण तापलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाने म्हटले आहे की, यातून काँग्रेसची संस्कृती दिसून येते आणि या लज्जास्पद घटनेबद्दल काँग्रेसने माफी मागावी.
कर्नाटकातील हुबळी येथील काँग्रेस नेते शिवशंकर हम्पन्ना एका महिला डान्सरच्या शेजारी नाचताना आणि तिच्यावर नोटा फेकताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील एका लग्न समारंभातील हळदी समारंभाची आहे. या व्हिडीओवर काँग्रेसची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही, मात्र भाजपाने याबाबत टोकाची भूमिका घेतली असून काँग्रेसवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना कर्नाटक भाजपाचे सरचिटणीस महेश तेंगिंकाई म्हणाले की, ही घटना अत्यंत लज्जास्पद आहे. त्यांना टीव्हीच्या माध्यमातून याबाबत माहिती मिळाली. महेश तेंगिंकाई म्हणाले, 'मी याबाबत स्पष्टपणे सांगेन, एक मुलगी नाचते आणि तिच्यावर पैसे फेकले जात आहेत. या लोकांना पैशाची किंमत कळत नाही. अशा उदाहरणांवरून काँग्रेसची संस्कृती काय आहे हे दिसून येते आणि ते आपण यापूर्वीही अनेकदा पाहिले आहे. त्याचा मी निषेध करतो. काँग्रेसने याकडे लक्ष द्यावे.
भाजपाचे प्रवक्ते रवी नाईक यांनीही काँग्रेसवर निशाणा साधत ते या मुलींना काय सन्मान देत आहेत, हा माझा एकच प्रश्न आहे. ही केवळ काँग्रेसची संस्कृती आहे असे दिसते. कारण लग्नाच्या ठिकाणी मुलींवर पैसे फेकण्याची संस्कृती आहे. फक्त काँग्रेसच स्पष्ट करू शकते. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे वागणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस कार्यकर्त्याने महिलेची त्वरित माफी मागितली पाहिजे आणि ही घटना 'महिलांचा पूर्णपणे अनादर करणारी' असल्याचे ते म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"