"मोदी खत्म हो गया, तो हिंदुस्तान बच जाएंगा"; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 10:11 PM2023-03-13T22:11:09+5:302023-03-13T22:11:50+5:30

'तुमचे मतभेद संपवा, मोदींना संपवण्यावर चर्चा करा. जर मोदी संपले तर हिंदुस्तान वाचेल. जर मोदी राहिले तर हिंदुस्तान संपेल,'

Congress leader sukhjinder randhawa's controversial statement about pm narendra modi and adani | "मोदी खत्म हो गया, तो हिंदुस्तान बच जाएंगा"; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

"मोदी खत्म हो गया, तो हिंदुस्तान बच जाएंगा"; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

googlenewsNext

काँग्रेसचेराजस्थान प्रभारी सुखजिंदर रंधावा यांनी सोमवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी उद्योगपती अदानी आणि अंबानी यांच्यावर भाष्य करत, काँग्रेस सरकार आल्यास त्यांना तुरुंगात टाकू, असे म्हटले आहे. त्यांनी काँग्रेस नेत्यांना आपले मतभेद बाजूला ठेवून मोदींना संपवण्यावर लक्ष द्या, असेही म्हटले आहे. 'तुमचे मतभेद संपवा, मोदींना संपवण्यावर चर्चा करा. जर मोदी संपले तर हिंदुस्तान वाचेल. जर मोदी राहिले तर हिंदुस्तान संपेल,' असे वादग्रस्त वक्तव्य रंधावा यांनी केले आहे. ते अदानी तसेच केंद्र सरकारच्या धोरनांविरोधातील प्रदेश काँग्रेसचे आंदोलन आणि राजभवन घेरावदरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. 

रंधावा म्हणाले, "शिस्त आली तर आपण एका दिवसात अदानींना भारतातून हाकलून देऊ. मोदी गेले की अदानी संपेल. भाजपला मारा, अदानी सोबतच मरेल. तुम्ही अदानी-अदानी करत आहात, मोदी-मोदी करा. मोदी देश विकत आहेत. आमचा लढाई अदानीशी नाही. आमची लढाई भाजपशी आहे, भाजपला मारा. अंबानी-अदानी सोबतच मरतील. काँग्रेस आल्यावर त्यांना तुरुंगात टाकायला हवे. आम्ही पंजाबमध्ये राहतो. पंजाबमधील दहशतवाद पंजाबींनी संपवला. जर अदानीला संपवायचे असेल, तर हे रास्थानमधील लोकहो आपल्यालाच करावा लागेल, जे माझ्यासमोर बसले आहेत."

रंधावा म्हणाले, "तुमचे मतभेद संपवा, मोदींना संपवण्यावर चर्चा करा'. मोदी संपले तर हिंदुस्तात वाचेल, मोदी राहिले तर हिंदुस्तान संपेल. ते म्हणतात माझ्यापेक्षा मोठा देशभक्त कोणी नाही. मोदींना देशभक्तीचा अर्थ माहीत नाही. स्वातंत्र्यासाठी भाजप आणि जनसंघाचे कुणीही लढले नाही. काँग्रेसचेच नेते तुरुंगात गेले. फासावर कोण गेले? मोदींच्या कुटुंब नाही, अमित शाहंचे नाही. रंधवा आपल्या नावाचा अर्थ हणांगणावर लढणारा, सांगत राजस्थानला रणांगण बनवू आणि येथून मोदींना संपवा." ते म्हणाले, 'राजस्थान जिंकले तर दुसऱ्याच दिवशी अदानी संपेल, कुठेही दिसणार नाही.'

Web Title: Congress leader sukhjinder randhawa's controversial statement about pm narendra modi and adani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.