'मी गृहमंत्री असताना मला कुणी सल्ला दिला होता की, आपण इकडे तिकडे भटकण्याऐवजी लाल चौकात जा. तेथे एखादे भाषण करा, तेथील लोकांना भेटा, डल तलावाला भेट द्या. असे केल्यास तेथील लोकांना वाटेल की, किती चांगला गृहमंत्री आहे. जो न घाबरता काश्मीरात जातो. यामुळे प्रसिद्ध तर मिळाली, पण खरे तर माझी फाट*** होती,' असे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. ते त्यांच्या जीवनावरील 'फाइव डेकेड्स ऑफ पॉलिटिक्स' या राशिद किदवई यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
आपण हे केवळ आपल्याला हसवण्यासाठी बोललो - शिंदे यांच्या या विधानानंतर संपूर्ण सभागृहात हशा पिकला. मात्र यानंतर, आपण हे केवळ आपल्याला हसवण्यासाठीच बोललो. एक माजी पोलीस कर्मचारी असे बोलू शकत नाही. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि दिग्विजय सिंह आदी उपस्थित होते.
भाजपचा पलटवार - माजी गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपने पलटवार केला आहे. भाजप प्रवक्ता शेहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया पोस्ट करत, "काँग्रेसने शिंदे यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यूपीए काळातील गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जम्मू-काश्मीरात जाण्याची भीती वाटत होती, अशी कबुली दिली. मात्र, आज राहुल गांधी सहजपणे काश्मिरात भारत जोडो यात्रा आणि स्नो फाइट करताना दिसू शकतात. मात्र नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा दहशतीच्या काळात घेऊन जायचे आहे," असे म्हटले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे काय म्हणाले? यावेळी शिंदे यांचे कौतुक करताना काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "स्वतःला अनुसूचित जातीचे सांगून आम्ही कधीही कुणाकडे काही मागत नाही. शिंदे यांनी महाराष्ट्रासाठी 9 अर्थसंकल्प मांडले आहेत. आजकाल महाराष्ट्रात एक-दो वर्षांतच लोक बदलतात." यावेली, दिग्विजय सिंह यांनीही शिंदे यांचे कौतुक केले. "गृहमंत्री असताना शिंदे यांनी इशान्येपासून ते कश्मीरपर्यंत दशहतवादाचा सामना केला," असे म्हटले आहे.