नवी दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण दत्त तिवारी व त्यांचा मुलगा रोहित शेखर यांनी बुधवारी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तिवारी (९१) यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. त्यांना त्यांचा मुलगा रोहितसाठी उत्तराखंडच्या कुमाऊ मतदारसंघातून उमेदवारी हवी असून, भाजप उमेदवारी देण्यास तयार असल्याचे सांगण्यात येते. तिवारींच्या प्रवेशामुळे उत्तराखंडमधील ब्राह्मण मते भाजपकडे वळतील, असे मानले जाते. उत्तराखंडमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. ७० सदस्यीय विधानसभेसाठी भाजपने आतापर्यंत ६४ उमेदवार घोषित केले आहेत. नव्यानेच पक्षात आलेल्या १५ जणांना उमेदवारी दिल्यामुळे उत्तराखंड भाजपमध्ये सुंदोपपसुंदी सुरू झाली. नारायणदत्त तिवारी (९१) यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे.>रोहितचा पित्याविरुद्ध लढारोहित शेखरने तिवारी हे आपले पिता असल्याचा दावा करून त्यांना न्यायालयात खेचले होते. सहा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर तिवारी शेखरचे पिता असल्याचे न्यायालयामध्ये सिद्ध झाले. तथापि, त्यानंतर तीन वर्षांनी तिवारी यांनी शेखरचा पुत्र म्हणून स्वीकार केला होता.
काँग्रेस नेते तिवारी पुत्रासह भाजपात
By admin | Published: January 19, 2017 5:02 AM