नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सिडनीतून भारतीय चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देत असताना विराटने फटाके न फोडण्याचं आवाहन केलं. सोशल मीडियावर विराटचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली तर काहींनी त्याची बाजू घेतली आहे. #अनुष्का_तेरा_कुत्ता_संभाल असा हॅशटॅग हा काही वेळ ट्रेंडिंगमध्ये होता. मात्र याच दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते उदीत राज यांनी विराटची बाजू घेतली.
उदीत राज यांनी मात्र विराटची बाजू घेत असताना एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी देखील विराटची तुलना ही थेट अनुष्काचा कुत्रा म्हणून केली आहे. उदीत राज यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरन याबाबत ट्विट केलं आहे. "कुत्र्यापेक्षा जास्त इमानदार कोणीच नाही. कोहली तू मूर्ख लोकांना प्रदुषणापासून माणसांना धोका असल्याची शिकवण दिलीस. विराट कोहलीच्या या चांगल्या सल्ल्याचं मी स्वागत करतो" असं ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे. विराटची तुलना ही थेट अनुष्काचा कुत्रा म्हणून केल्याने कोहलीचे चाहते संतापले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराटनं घेतली सुट्टी
भारतीय नियामक क्रिकेट मंडळानं ( BCCI) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या तीनही संघांची निवड केली. रोहित शर्माचा कसोटी मालिकेसाठीच्या संघात निवड जाहीर करताना BCCIनं कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परतणार असल्याचे सांगितले. विराट-अनुष्का शर्मा प्रथमच आई-वडील होणार आहेत आणि अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराटनं रजा मागितली. बीसीसीआनं कर्णधाराच्या या निर्णयाचा आदर करताना ही सुट्टी मान्य केली. पण, विराटच्या या निर्णयावर नेटिझन्समध्ये जुंपली आहे.
विराटनं 'राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्या'ऐवजी कुटुंबाला प्राधान्य दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं गेलं. अनेकांनी तर विराटला महेंद्रसिंग धोनीच्या त्यागाची आठवण करून दिली. 2015च्या वर्ल्ड कप साठी धोनी दौऱ्यावर होता आणि त्याचवेळी मायदेशात असलेल्या पत्नी साक्षीची प्रसुती झाली आणि झिवाचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर लगेच भारतात परतण्याऐवजी धोनीने संघाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आणि मालिकेमधील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतरच मायदेशात परतला होता.