काँग्रेस नेत्यांवर अन्य राज्यातील निवडणुकींची जबाबदारी, प्रभारी एच. के. पाटील यांनी केली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 04:21 AM2021-01-31T04:21:57+5:302021-01-31T04:22:02+5:30

Congress News : केरळ, तामिळनाडू, आसाम  आणि  प.  बंगालसह  दुसऱ्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते जबाबदारी सांभाळणार आहेत.

Congress leaders are responsible for elections in other states. K. Discussion by Patil | काँग्रेस नेत्यांवर अन्य राज्यातील निवडणुकींची जबाबदारी, प्रभारी एच. के. पाटील यांनी केली चर्चा

काँग्रेस नेत्यांवर अन्य राज्यातील निवडणुकींची जबाबदारी, प्रभारी एच. के. पाटील यांनी केली चर्चा

googlenewsNext

- शीलेश शर्मा
नवी  दिल्ली : केरळ, तामिळनाडू, आसाम  आणि  प.  बंगालसह  दुसऱ्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते जबाबदारी सांभाळणार आहेत. कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी  एच.  के.  पाटील यांनी राज्यातील नेते सुनील केदार, नितीन राऊत यांच्यासह काही अन्य मंत्र्यांशी आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली.  या  नेत्यांना पाटील यांनी दिल्लीत बोलाविले होते.

सूत्रांनी सांगितले की, सुनील केदार यांना पश्चिम बंगालमध्ये पाठविले  जाऊ  शकते. केदार यांनी पक्ष नेतृत्वाला यापूर्वीच आपल्या  कर्तृत्वाची  झलक  दाखविली  आहे.  मध्यप्रदेशातील निवडणुकीत त्यांना  ग्वाल्हेर  भागाची जबाबदारी देण्यात  आली  होती.  

या  पोटनिवडणुकीत सर्वाधिक जागा  जिंकण्यात  पक्षाला  यश  मिळाले. नितीन राऊत हेही निवडणुकीचे  समीकरणे  जुळविण्यात  माहीर समजले जातात. पाटील यांनी  या  सर्व मंत्र्यांसोबत त्यांच्या क्षेत्रात  चालणाऱ्या  पक्षाच्या  घडामोडींचा  आढावा घेतला. तसेच,  या  मुद्यावरही  चर्चा झाली की, विदर्भात पक्षाचा  जनाधिकार  कसा  मजबूत केला जावा.
 

Web Title: Congress leaders are responsible for elections in other states. K. Discussion by Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.