Acharya Pramod Krishnam on DMK MP Senthilkumar S Remark: 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 3 हिंदी भाषिक राज्यांमध्ये विजयाचा झेंडा फडकवला. यावरुन द्रमुकचे खासदार डीएनव्ही सेंथिलकुमार यांनी हिंदी राज्यांचा ‘गोमूत्र राज्ये’ असा उल्लेख केल्याने नवा वाद सुरू झाला आहे. या विधानावरुन काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, 'काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, द्रमुकचे नेते रावणाच्या कुळातील, राक्षस आहेत. या सर्वांना भारताचा नाश करायचा आहे. सनातन धर्म नष्ट करणे, हाच त्यांचा उद्देश आहे. त्यांना भारतीय लोकशाही नष्ट करायची आहे. द्रमुकचे नेते सनातन धर्माविरुद्ध असाच मूर्खपणा करत राहिले, तर फक्त गोमूत्र राज्यच नाही, तर बैल राज्यांमध्येही भाजपचा झेंडा फडकेल.'
काय म्हणाले द्रमुक खासदार? वाचा-भाजपची गोमुत्र राज्येच जिंकण्याची ताकद, दक्षिणेत घुसू देणार नाही; DMK नेत्याचे संसदेत वादग्रस्त वक्तव्य
यापूर्वीही मोठा वाद झाला आहेडीएमके नेते आणि तामिळनाडू सरकारचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री, उदयनिधी स्टॅलिन यांनीही सनातन धर्माबाबत विधान केल्याने मोठा वाद झाला होता. स्टॅलिन यांनी "सनातन धर्म हा मलेरिया आणि डेंग्यूसारखा आहे, ज्याचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे," असे वक्तव्य केले होते. स्टॅलिनच्या विधानाने संपूर्ण देशातील राजकारण दोन गटात विभागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावरुन काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीका केली होती.