"काँग्रेस नेत्यांचे चिकन, सँण्डविचकडे लक्ष; देशावर संकट आल्यावर परदेशात गेले"; हार्दिक पटेलच्या पत्रात काय लिहिलंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 01:01 PM2022-05-18T13:01:10+5:302022-05-18T13:01:34+5:30
देशातील लोकांना विरोध नकोय तर असा पर्याय हवाय जे त्यांच्या भविष्याबद्दल विचार करतील. देशाला पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहेत असं हार्दिक पटेलनं म्हटलं.
अहमदाबाद – गुजरात काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल(Congress Hardik Patel) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अलीकडच्या काळात हार्दिक पटेल भाजपाच्या धोरणांचं कौतुक आणि स्वपक्षातील नेत्यांवर आरोप करत असल्याने ते काँग्रेस सोडतील अशी चर्चा आधीपासून सुरू होती. आता सोशल मीडियावर हार्दिक पटेल यांनी राजीनामा पत्र शेअर केले आहे. हिंदी, गुजरात आणि इंग्रजीत हे पत्र आहे.
या पत्रात म्हटलंय की, २१ व्या युगात भारत जगातील सर्वात युवा देश आहे. देशातील युवकांना एक सक्षम आणि कणखर नेतृत्व हवंय. मागील ३ वर्षापासून मी पाहतोय काँग्रेस केवळ विरोधाचं राजकारण करत आहे. पण देशातील लोकांना विरोध नकोय तर असा पर्याय हवाय जे त्यांच्या भविष्याबद्दल विचार करतील. देशाला पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहेत. अयोध्येत राम मंदिर असो, CAA NRC मुद्दा असो, जम्मू काश्मीरातील कलम ३७० रद्द करणे किंवा जीएसटीबाबत निर्णय असो. देशाला अनेक वर्षापासून यावर तोडगा हवा होता परंतु काँग्रेस पक्ष केवळ बाधा घालण्याचं काम करत होती असं हार्दिकने सांगितले आहे.
तसेच देश असो, गुजरात असो वा पटेल समाज प्रत्येक मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका केवळ केंद्र सरकारचा विरोध करण्यापर्यंत मर्यादित आहे. काँग्रेसला जवळजवळ सर्वच राज्यातील जनतेने रिजेक्ट केले आहे. कारण काँग्रेस पक्ष नेतृत्व जनतेसमक्ष एक बेसिक रोडमॅप देऊ शकले नाहीत. कुठल्याही मुद्द्याबद्दल गांभीर्य कमी आहे असणं मोठं कारण आहे. मी जेव्हा या गोष्टींबाबत सांगत होतो तेव्हा मोबाईल आणि अन्य गोष्टींवर लक्ष देत होते. जेव्हा जेव्हा देश संकटात होता तेव्हा आमचे नेते परदेशात जात होते. पक्ष नेतृत्वाला गुजरात आणि गुजरातच्या लोकांबद्दल द्वेष असल्यासारखं वाटत असे. अशात गुजरातची जनता काँग्रेसकडे कुठल्या अपेक्षेने पाहणार? असा प्रश्न हार्दिकनं पत्रात केला आहे.
आज मैं हिम्मत करके कांग्रेस पार्टी के पद और पार्टी की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा देता हूँ। मुझे विश्वास है कि मेरे इस निर्णय का स्वागत मेरा हर साथी और गुजरात की जनता करेगी। मैं मानता हूं कि मेरे इस कदम के बाद मैं भविष्य में गुजरात के लिए सच में सकारात्मक रूप से कार्य कर पाऊँगा। pic.twitter.com/MG32gjrMiY
— Hardik Patel (@HardikPatel_) May 18, 2022
दरम्यान, आमच्यासारखे कार्यकर्ते स्वत: गाडीचा खर्च करून दिवसाला ५००-६०० किमी प्रवास करत होते. जनतेमध्ये जात होते तेव्हा गुजरातचे मोठे नेते केवळ दिल्लीतील आलेल्या नेत्यांना वेळेवर चिकन, सँण्डविच मिळाले का यावर लक्ष देत राहिले. जे गुजरातींचा सन्मान करत नाही अशा पार्टीत का आहात? असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून वारंवार विचारला जात होता. काँग्रेस पक्षाने युवकांचा भरवसा तोडला आहे. ज्यामुळे कुठलाही युवक काँग्रेससोबत राहू इच्छित नाही असा आरोप हार्दिक पटेलनं केला आहे.