मोर्चा काढला; काँग्रेस नेत्याचे घरच पाडले, ‘ते’ वक्तव्य महाराष्ट्रात, पडसाद एमपीमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 09:23 AM2024-08-24T09:23:33+5:302024-08-24T09:24:09+5:30
या कारवाईमुळे मध्य प्रदेशसह उत्तर प्रदेशातील सीमाभागात खळबळ उडाली आहे.
- अभिलाष खांडेकर
भाेपाळ : शेजारी उत्तर प्रदेशात राज्य सरकार अवलंबत असलेली ‘बुलडाेझर’ नीती मध्य प्रदेशात पुन्हा परतली असून, या दाेन राज्यांच्या सीमेलगत असलेल्या बुंदेलखंड भागात अशाच एका अभूतपूर्व कारवाईत एका काँग्रेस नेत्याचे २० हजार वर्ग फूट घर गुरुवारी पाडण्यात आले. या कारवाईमुळे मध्य प्रदेशसह उत्तर प्रदेशातील सीमाभागात खळबळ उडाली आहे.
नेमके काय झाले?
महाराष्ट्रातील नाशिकमध्ये १५ ऑगस्ट राेजी महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या कथित वादग्रस्त धार्मिक वक्तव्याच्या निषेधार्थ एका जमावाने छतरपूर पाेलिस ठाण्यावर माेर्चा काढून हल्ला केला हाेता. या जमावाचे नेतृत्व करणाऱ्यांची ओळख पटवून शहजाद अली, त्याचे मित्र जावेद अली, नजीम चाैधरी तसेच आझाद अली हेच हल्ल्याचे मास्टरमाइंड असल्याच्या निष्कर्षावर पाेलिस आले. त्यानुसार ही कारवाई केली. यात एसयूव्हीसह चार कार आणि काही दुचाकी नष्ठ केल्या.