केरळ विधानसभेत ग्रेनेड घेऊन घुसले काँग्रेस आमदार, अभूतपूर्व गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 05:54 PM2018-03-07T17:54:14+5:302018-03-07T17:54:14+5:30

केरळ विधानसभेत ग्रेनेड घेऊन दाखल झालेल्या काँग्रेस आमदारांमुळे आज अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला होता. थिरुवंचूरमधले काँग्रेस पक्षाचे आमदार राधाकृष्णन वापरून झालेलं ग्रेनेड घेऊन विधान भवनात शिरले.

Congress legislators come to the Kerala Legislative Assembly with a grenade, unprecedented mess | केरळ विधानसभेत ग्रेनेड घेऊन घुसले काँग्रेस आमदार, अभूतपूर्व गोंधळ

केरळ विधानसभेत ग्रेनेड घेऊन घुसले काँग्रेस आमदार, अभूतपूर्व गोंधळ

googlenewsNext

तिरुवनंतपुरम- केरळ विधानसभेत ग्रेनेड घेऊन दाखल झालेल्या काँग्रेस आमदारांमुळे आज अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला होता. थिरुवंचूरमधले काँग्रेस पक्षाचे आमदार राधाकृष्णन वापरून झालेलं ग्रेनेड घेऊन विधान भवनात शिरले. त्यांनी ग्रेनेड हातात घेऊन विधानसभा अध्यक्षांना दाखवले आणि सांगितले की, हे ग्रेनेड दाखवूनच गेल्या आठवड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना घाबरवण्यात आलं होतं. 

तर गेल्या काही तासांपूर्वीच कर्नाटकचे लोकायुक्त पी. विश्वनाथ शेट्टी यांना त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. गंभीर अवस्थेत शेट्टींना रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. हल्लेखोर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरुतल्या लोकायुक्त कार्यालयात बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. लोकायुक्त पी. विश्वनाथ शेट्टी त्यांच्या ऑफिसमध्ये एका प्रकरणावर सुनावणी करत असताना ही घटना घडली होती.

आरोपींनी धारदार शस्त्राने लोकायुक्तांवर हल्ला केला. तेजस शर्मा असं आरोपी हल्लेखोराचं नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली. तो टुमकुरचा रहिवासी असल्याची माहिती आहे. त्याप्रमाणेच केरळ विधानसभेत बुधवारी सभागृहात काँग्रेस आमदार ग्रेनेड घेऊन दाखल झाले. त्यामुळे अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला होता. थिरुवंचूर काँग्रेस पक्षाचे आमदार राधाकृष्णन यांनी निकामी ग्रेनेड घेऊन विधान भवनात दाखल झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. 

Web Title: Congress legislators come to the Kerala Legislative Assembly with a grenade, unprecedented mess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.