Opposition Alliance Lok Sabha Election Survey:लोकसभा निवडणुकीला एक वर्षापून कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्वच मोठे पक्ष तयारीला लागले आहेत. एका बाजुला भाजपच्या नेतृत्वातील NDA आहे, तर दुसऱ्या बाजुला नुकतीच स्थापन झालेली INDIA आघाडी आहे. या दोन्ही मोठ्या आघाड्या पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जास्त जागा जिंकू शकले नाही, पण या निवडणुकीत इंडिया आघाडीचा काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो.
भाजपविरोधात काँग्रेसने अनेक पक्षांना सोबत घेतल्यामुळे लोकांमध्येही आगामी निवडणुकीबाबत उत्सुकता वाढू लागली आहे. इंडिया आघाडीच्या स्थापनेमुळे काँग्रेसला फायदा होईल का? काँग्रेस पूर्वीपेक्षा मजबूत होईल का? असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात आहेत. इंडिया टीव्ही सीएनएक्सने केलेल्या एका सर्वेक्षणातून या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.
सर्वेक्षणाच्या निकालानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला देशातील नागरिकांचा जास्तीत जास्त पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. तर विरोधी आघाडीची कामगिरी मागे पडल्याचे चित्र आहे. जर आपण फक्त काँग्रेसबद्दल बोललो, तर देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसच्या लोकसभेच्या जागांमध्ये सुमारे एक तृतीयांश वाढ होण्याची अपेक्षा आहे.
सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला 318 जागांवर विजय मिळताना दिसत आहे. तर 50 जागा इतरांच्या खात्यात जाण्याचा अंदाज आहे. सर्वेक्षणात लोकांचा असा विश्वास आहे की जर काँग्रेसने विरोधकांना एकत्र करून निवडणुकीत लढवली, तर इंडिया आघाडीला सूमारे 175 जागा मिळू शकतात. इंडिया आघाडीतील काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या. त्याआधी 2014 च्या निवडणुकीत पक्ष केवळ 44 जागांवर आला होता. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 66 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच 2019 च्या तुलनेत काँग्रेसला जवळपास 30 टक्के जास्त जागांचा फायदा होताना दिसत आहे. लोकसभेच्या एकूण जागांची संख्या 543 आहे आणि सरकार स्थापनेची जादूची संख्या 272 आहे.