Congress LokSabha 2024 List: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यत आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि दमण दीवमधील 43 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील हायप्रोफाईल जागा मानल्या जाणाऱ्या छिंदवाडा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांना तिकीट दिले आहे. तर, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना जालोर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
पाहा काँग्रेसची दुसरी यादी
राजस्थानमधील उमेदवारराजस्थानमधील लोकसभेच्या 25 पैकी 10 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात जालोरमधून वैभव गेहलोत, बिकानेरमधून गोविंद मेघवाल, चुरुमधून राहुल कासवा, झुंझुनूमधून बृजेंद्र ओला, अलवरमधून ललित यादव, भरतपूरमधून संजना जाटव, टोंकमधून हरीश मीना, जोधपूरमधून करणसिंग उचियाराडा, उदयपूरमधून ताराचंद मीना आणि चित्तौडमधून उदयलाल अंजाना यांना उमेदवारी दिली आहे.
मध्य प्रदेशातील उमेदवार मध्य प्रदेशातील ज्या 10 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, त्यामध्ये छिंदवाडामधून नकुलनाथ, भिंडमधून फूलसिंग बरैया, टिकमगडमधून पंकच अहिरवार, सतनामधून सिद्धार्थ कुशवाह, सिधीमधून कमलेश्वर पटेल, मंडलामधून ओंकार सिंग मरकाम, देवासमधून राजेंद्र मालवीय, धारमधून राधेश्याम मुवेल, खरगोनमधून पोरलाल खर्ते, बैतूलमधून रामू टेकाम यांना तिकीट मिळाले आहे.
आसाममधील 14 पैकी 12 जागांसाठी उमेदवार जाहीरकाँग्रेसने आसाममधील लोकसभेच्या 12 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कोक्राझारमधून गर्जन मश्रे, धुबरीतून रकीबुल हसन, बारपेटामधून दीप बयान, दारा उदलगुरीमधून माधब राजवंशी, गुवाहाटीमधून मीरा बोरठाकूर गोस्वामी, दिपूमधून जयराम आंगलोंग, करीमगंजमधून हाफिज रशीद अहम चौधरी, सुराज्यातून सिलसिलेवार, नागावमधून बोरदोलोई, काझीरंगातून रोसेलिना टिर्के, सोनितपूरमधून प्रेमलाल गंजू आणि जोरहाटमधून गौरव गोगोई यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
उत्तराखंडच्या ती उमेदवारांची घोषणाउत्तराखंडमधील चार जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार घोषित केले आहेत. टिहरी गढवालमधून जोतसिंग गुंटसोला, गढवालमधून गणेश गोदियाल आणि अल्मोडामधून प्रदीप टमटा यांचा समावेश आहे. तर दमण आणि दीवमध्ये केतन दह्याभाई पटेल यांना तिकीट देण्यात आले आहे.
गुजरातमध्ये 7 जागांसाठी उमेदवार जाहीरकाँग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत गुजरातमधील 26 पैकी 7 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. पक्षाने कच्छमधून नितीश भाई लालन, बनस्कांठामधून गेनीबेन ठाकोर, अहमदाबाद पूर्वमधून रोहन गुप्ता, अहमदाबाद पश्चिममधून भरत मकवाना, पोरबंदरमधून ललित भाई वसोया, बारडोलीमधून सिद्धार्थ चौधरी, वलसाडमधून अनंत भाई पटेल यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसने या यादीत 7 जनरल, 13 ओबीसी, 10 एससी, 9 एसटी आणि एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले आहे.