काँग्रेसने ईशान्येला आंदोलनाची भूमी बनवली; अमित शाहांनी काँग्रेसवर साधला निशाना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 03:57 PM2022-10-08T15:57:52+5:302022-10-08T15:58:00+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसाम दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी येथील भाजपच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले.

Congress made North East a land of agitation, BJP established peace says Amit Shah | काँग्रेसने ईशान्येला आंदोलनाची भूमी बनवली; अमित शाहांनी काँग्रेसवर साधला निशाना

काँग्रेसने ईशान्येला आंदोलनाची भूमी बनवली; अमित शाहांनी काँग्रेसवर साधला निशाना

Next

गुवाहाटी: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसाम दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी येथील भाजपच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी क्राँग्रेसवर निशाना साधला. "इशान्येतील भूमिला काँग्रेसने आंदोलनाची भूमी बनवले आहे. विकास नव्हता तर फक्त दंगे होते, ना शिक्षण होते, ना शांती, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर केली. 

२०१४ नंतर इशान्येच्या भूमित विकास होत आहे याची मला खुशी आहे. आमचे सरकार आल्यानंतर इशान्येच्या राज्यात विकास कामे सुरू झाली आहेत.आता भाजप पक्षाचेही इशान्येच्या भूमित विकास सुरू आहे. भाजपचे हे कार्यालय कार्यकर्त्यांसाठी मंदीर आहे, असंही अमित शाह म्हणाले. 

आरएसएस'ने इंग्रजांना मदत केली, सावरकरांना स्टायपेंड मिळत होते; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेस हा विचारी पक्ष नाही. आमचा पक्ष विचारी पक्ष आहे, आमचा पक्ष सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. आपल्याला आपला पक्ष मजबूत करायचा आहे. आज ७० हजार लोक आमच्या विचारधारेत सामील होत आहेत, असंही अमित शाह म्हणाले. 

यावेळी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही काँग्रेसवर टीका केली.'एक काळ असा होता की आसाम चार देशांनी वेढलेला होता, संकटात होता. देशाचे नेतृत्व कमकुवत होते. पण, आज हा ईशान्य, हा आसाम मुख्य प्रवाहात सामील झाला आहे आणि विकासाच्या प्रक्रियेत प्रामुख्याने पुढे येत आहे. एकेकाळी हे राज्य आंदालनासाठी ओळखले जायचे. आज ते एक शांत आणि विकसनशील राज्य आहे, असंही जे पी नड्डा म्हणाले.  

Web Title: Congress made North East a land of agitation, BJP established peace says Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.