Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 12:55 PM2024-09-25T12:55:23+5:302024-09-25T13:02:23+5:30
Congress Mallikarjun Kharge And BJP : काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कंगना राणौतच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे.
भाजपा खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानामुळे देशातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कंगना राणौतच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. तसेच भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपामध्ये शेतकरीविरोधी द्वेषाची मानसिकता असल्याचं साऱ्या देशाला कळून चुकलं आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "७५० शेतकऱ्यांच्या हौतात्म्यानंतरही शेतकरी विरोधी भाजपा आणि मोदी सरकारला त्यांचा गंभीर गुन्हा लक्षात आलेला नाही. तीन काळे शेतकरी विरोधी कायदे पुन्हा लागू करण्याची चर्चा आहे. याला काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने आमच्या अन्नदात्यांसाठी काटेरी तार, ड्रोन, अश्रुधुराचा वापर, खिळे आणि बंदुकांचा वापर केला हे भारतातील ६२ कोटी शेतकरी कधीही विसरणार नाहीत."
750 किसानों की शहादत के बाद भी किसान विरोधी भाजपा और मोदी सरकार को अपने घोर अपराध का अहसास नहीं हुआ !
— Mallikarjun Kharge (@kharge) September 25, 2024
तीन काले किसान-विरोधी क़ानूनों को फिर से लागू होने की बात की जा रही है। कांग्रेस पार्टी इसका कड़ा विरोध करती है।
किसानों को गाड़ी के नीचे कुचलवाने वाली मोदी सरकार ने हमारे…
"मोदीजींच्या विधानांमुळे त्यांचे मंत्री, खासदार आणि प्रचार यंत्रणेला शेतकऱ्यांचा अपमान करण्याची सवय लागली आहे. १० वर्षात मोदी सरकारने देशातील अन्नदात्यांना दिलेली तीन आश्वासने तोडली आहेत. १ - २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट. २ - स्वामिनाथन अहवालानुसार इनपुट कॉस्ट + ५०% एमएसपीची अंमलबजावणी. ३ - MSP ला कायदेशीर दर्जा. शेतकरी आंदोलन मागे घेताना मोदीजींनी सरकारी समितीची घोषणा केली होती, ती अजूनही तशीच आहे."
"मोदी सरकार एमएसपीच्या कायदेशीर हमीच्या विरोधात आहे. शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत देण्यात आली नाही, त्यांच्या स्मरणार्थ संसदेत दोन मिनिटे मौन पाळणेही मोदी सरकारने योग्य मानले नाही आणि सतत त्यांचं चारित्र्यहनन सुरू आहे. भाजपामध्ये शेतकरीविरोधी द्वेषाची मानसिकता असल्याचं साऱ्या देशाला कळून चुकलं आहे" असं म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.