- शीलेश शर्मानवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी हे काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातील मुख्य मुद्दे असतील. या या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यांचा जाहीरानाम्यात समावेश करण्यात आला असून, २ एप्रिल रोजी काँग्रेस निवडणूक जाहीरनामा जारी करणार आहे.उच्चपदस्थ सूत्रांनुसार बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर मुख्यत्वे भर देत काँग्रेसच्या सर्व प्रवक्त्यांनी चर्चेत आवर्जून हे दोन्ही मुद्दे मांडून या दोन्ही मुद्यांवर भाजपाला बोलण्यास भाग पाडण्यास विवश करावे, अशा स्पष्ट सूचना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्या आहेत. या सूचेननुसार जाहीरनामा जारी होण्याआधीच काँग्रेस बेरोजगारीच्या मुद्यांवर मोदी सरकारवर निशाणा साधत आहे.मोदी यांना रोजगार विनाशक पंतप्रधान, असे संबोधत माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेशा यांनी मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. २०१८ मध्ये मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे एक कोटी नोकºयाच गायब झाल्या. सरकारी आकडेवारी सादर करून मुद्रा योजनेतहत रोजगार निर्माण झाल्याचा मोदी यांचा दावाही दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०१७-१८ मध्ये मुद्रा योजनेतहत २४,८४० रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. एवढ्या कमी रकमेत कोणता व्यवसाय सुरू करता येतो. यातून एकही रोजगार निर्माण होऊ शकत नाही. दोन टक्के कर्ज पाच लाखांचे होते. मुद्रा योजनेचे तीन वर्ग आहेत. यात शिशू, किशोर आणि तरुण वर्गाचा समावेश आहे. शिशू योजनेतहत देण्यात आलेल्या ८८ टक्के कर्जाची रक्कम २,४८,४० रुपये होती.आकडेवारी गुलदस्त्यातपंतप्रधान मोदी आणि त्यांचे सरकार आकडेवारी लपवीत आहे. ही आकडेवारी जाहीर झाल्यास सरकारचा फोलपणा उघड होईल. सरकारचा दावा खरा मानल्यास ४५ वर्षांत सर्वाधिक बेरोजगारी मोदी सरकारच्या काळात झाली. निती आयोगाने श्रम विभागाकडन २१ फेब्रुवारी २०१९ रोजी मुद्रा योजनेतहत किती रोजगार निर्माण झाले, याची आकडेवारी मागितली आहे. तथापि, अद्याप सरकारने आणि निती आयोगाने याबाबत खुलासा केलेला नाही.
२ एप्रिल रोजी काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा; शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी प्रमुख मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 5:05 AM