शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

काँग्रेस सदस्य आरोग्यमंत्र्यांना भिडले; राहुल गांधी यांचा निषेध करताच विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 4:12 AM

सत्ताधारी व विरोधी पक्ष सदस्यांमध्ये खडाजंगी उडाली. त्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले.

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्याचा आरोप करून, त्या वक्तव्यांचा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी लोकसभेत निषेध केला. त्यावेळी सत्ताधारी व विरोधी पक्ष सदस्यांमध्ये खडाजंगी उडाली. त्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले.

काँगेस सदस्यांनी सभागृहात माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप हर्षवर्धन यांनी नंतर केला. ते म्हणाले की, काँग्रेसचे सदस्य माझ्यापर्यंत चाल करून आले. त्यांनी माझी कागदपत्रे हिसकावली. मोदींवर राहुल गांधी यांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. माजी पंतप्रधानाच्या पुत्राने अशी भाषा वापरणे अपेक्षित नव्हते. या प्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी.

राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन उभे राहिले. आपण राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविषयी काढलेल्या उद्गारांचा समाचार घेऊन, मग प्रश्नाला उत्तर देऊ, असे ते म्हणताच, काँँग्रेसच्या सदस्यांनी त्यास आक्षेप घेतला. प्रश्नाचेच उत्तर द्या, असा आदेश लोकसभाध्यक्षांनीही हर्षवर्धन यांना दिला, तरीही आरोग्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांचा निषेध केला.त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांनी हर्षवर्धन यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तेव्हा हर्षवर्धन यांच्या रोखाने चाल करून गेलेले काँग्रेसचे मनिकम टागोर यांना भाजपचे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी अडविले.

काँग्रेसचे हिबी इदेन यांनीही आक्रमक पवित्रा धारण केला. या सर्वांना रोखण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांचे सदस्य पुढे सरसावले. त्यावेळी मंत्री स्मृती इराणी यांनी हे तुम्ही काय करत आहात, असा सवाल संतप्त सदस्यांना विचारला. या गदारोळातही हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांचा निषेध करणारे भाषण सुरूच ठेवले.

सहा महिन्यांनी देशातील युवक पंतप्रधानांना काठ्यांनी चोप देऊन देशाबाहेर हाकलतील, असे अत्यंत अश्लाघ्य उद्गार राहुल यांनी काढल्याचे हर्षवर्धन म्हणाले. त्यावर इतकी खडाजंगी झाली की, अध्यक्षांनी कामकाजाआधी एक तास व नंतर दिवसभरासाठी सभागृह तहकूब केले.

बाबुल सुप्रियोंना खडसावले

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या उद्गारांचा काँग्रेस सदस्यांनी सुप्रियो यांचा निषेध केला. सभागृहातील कोणत्याही सदस्यावर वाट्टेल ती टीका करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही, अशा शब्दांत बाबुल सुप्रियो यांना बिर्ला यांनी खडसावले. हे उद्गार लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले.

राहुल गांधी : मोदी पंतप्रधानांसारखे वागत नाहीत

नरेंद्र मोदी पंतप्रधानांसारखे वागत नाहीत, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी आपली आब राखायला हवी, पण मोदी तसे करीत नाहीत. मोदींच्या गुरुवारच्या लोकसभेतील भाषणाच्या वेळी राहुल गांधी यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राहुल यांना उद्देशून मोदी म्हणाले की, काही जणांची ट्यूब उशिरा पेटते. मी ३०-४० मिनिटे बोलतो आहे, पण त्याचा करंट आता काही लोकांपर्यंत पोहोचला. या उद्गारांवर राहुल गांधी यांनी हे उद्गार काढले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस