Video: मतांसाठी कायपण..!! कर्नाटकच्या काँग्रेस मंत्र्याचा 'नागिन' डान्स व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 19:00 IST2019-04-10T18:58:57+5:302019-04-10T19:00:31+5:30
मतदारांना आकर्षिक करण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. असाच एक किस्सा घडलाय कर्नाटकचे गृहनिर्माण मंत्री एमटीबी नागराज यांच्यासोबत

Video: मतांसाठी कायपण..!! कर्नाटकच्या काँग्रेस मंत्र्याचा 'नागिन' डान्स व्हायरल
बंगळुरू - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला गुंतले आहेत. उमेदवार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक पर्यायांचा वापर करत आहे. मतदारांना आकर्षिक करण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. असाच एक किस्सा घडलाय कर्नाटकचे गृहनिर्माण मंत्री एमटीबी नागराज यांच्यासोबत.
कर्नाटकचे मंत्री एमटीबी नागराज यांनी प्रसिद्ध नागिन गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड प्रमाणात सोशल मिडीयात व्हायरल होतोय. नागराज हे आपल्या कार्यकर्त्यांसह होसकोटे येथील काटीगेनहल्ली या गावात कार्यकर्त्यांसह प्रचाराला पोहचले. काँग्रेस उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या चिकबल्लापूर लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी गेले असता नागराज यांनी नागिन डान्स केला.
#WATCH Karnataka Housing Minister MTB Nagraj dances with a group of people while campaigning in Hoskote. #LokSabhaElections2019pic.twitter.com/InQmOuLOis
— ANI (@ANI) April 10, 2019
कर्नाटकचे गृहनिर्माण मंत्री नागराज यांच्या प्रचार रॅलीसोबत सहभागी असलेल्या बॅन्डवर नागिन धून वाजविण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांसह नागराजही डान्समध्ये सहभागी होता नागिन डान्स सुरु केला. जवळपास 10 मिनिटे मंत्र्यांचा नागिन डान्स सुरु होता. कर्नाटकच्या या मंत्र्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.