आसाममध्ये हिंदू समुदायाबाबत अपमानकारक आणि आक्षेपार्ह टिप्पणी करण्याच्या आरोपाखाली काँग्रेसआमदाराला अटक करण्यात आली आहे. आफताब उद्दीन मोल्ला असं अटक करण्यात आलेल्या काँग्रेसआमदाराचं नाव असून, त्यांनी हिंदू धर्मीय आणि मंदिरातील पुजाऱ्यांबाबत अपमानकारक विधान केल्याचा आरोप आहे.
आफताब यांना ७ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथून अटक करण्यात आली. त्यावेळी ते आमदार वाजेद अली चौधरी यांच्या निवास्थानी होते. हिंदू समुदायाबाबत अपमानकारक टीका केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. आफताब यांनी गोलपारा येथे एका सभेला संबोधित करताना जिथे कुठे हिंदू आहेत तिथे चुकीची कामं होतात. मंदिरांचे पुजारी आणि नामघरची देखभाल करणारे बलात्कारी असतात, असे आफताब उद्दीन मोल्ला म्हणाले होते.
या वक्तव्यानंतर काँग्रेसचे आमदार आफताब यांच्यावर आसाममधील दिसपूर पोलीस ठाण्याता कलम २९५ (a), १५३A(१)(b)/५०५(२)IPC अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. काँग्रेसनेही या आमदारांना कारणे दाखवा नोटिस बजावली होती. दरम्यान, जालेश्वर विधानसभा मतदारसंघातील आमदार आफताब उद्दीन यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती आसाम पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.