शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

बंगळुरूतल्या काँग्रेस आमदाराकडे 120 कोटींची अघोषित संपत्ती

By admin | Published: February 13, 2017 10:58 AM

कर्नाटकमधील काँग्रेसच्या आमदाराकडे 120 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती आढळून आली आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - कर्नाटकमधील काँग्रेसच्या आमदाराकडे 120 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती आढळून आली आहे. गेल्या आठवड्यात प्राप्तिकर विभागाकडून आमदाराची कार्यालये आणि निवासस्थानं, अशा विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत होते. या छाप्यादरम्यान 1.10 कोटी रुपयांची रोकड, 10 किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे. काँग्रेस आमदार एम. टी. बी. नागराज यांची अघोषित संपत्ती असल्याचा सुगावा प्राप्तिकर विभागाला लागल्यामुळे आमदारांच्या विविध कार्यालये आणि निवासस्थानांवर त्यांनी छापे टाकले आहेत. या काँग्रेस आमदारावर कर बुडवल्याचाही आरोप आहे. नागराज यांनी कर बुडवल्याप्रकरणी लावण्यात आलेल्या चौकशीवरून हे छापे टाकण्यात आले असून, छाप्यात 120 कोटींहून अधिक मालमत्तेचा खुलासा झाला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यानं दिली आहे. आमदाराने व्यावसायिक संपत्ती, रुग्णालयं, घर, बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने कर्ज घेऊन एवढी मोठी संपत्ती जमवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या छाप्यात आमदार आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या 560 एकर जमिनीची 3500हून अधिक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आमदाराला जमिनीच्या मोबदल्यात मिळालेल्या 70 कोटी रुपयांचीही चौकशी सुरू आहे. तत्पूर्वी 23 जानेवारीला प्राप्तिकर विभागाने कर्नाटकचे एक मंत्री आणि प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये सुमारे 162 कोटींहून अधिक अघोषित मालमत्ता आढळून आली होती. प्राप्तिकर विभागाच्या या छाप्यात 41 लाखांच्या रोकडसह सोने, चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.