छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये काँग्रेसचे आमदार बृहस्पती सिंह यांच्या गुंडगिरीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये आमदार जनतेसमोर वातावरण निर्माण करण्यासाठी बँकेच्या शिपायाला आणि क्लार्कला विनाकारण मारहाण करत आहेत. आमदार सरकारी कर्मचाऱ्यांशी भांडताना दिसत असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ 3 एप्रिलचा आहे, पण तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आमदार बृहस्पती सिंह सुरगुजा येथील रामानुजगंजच्या जिल्हा सहकारी सेंट्रल बँकेच्या शिपायाला आधी मारहाण करतात आणि नंतर बँकेच्या क्लार्कच्या कानशिलात मारतात. ही संपूर्ण घटना बँकेच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आमदाराच्या जवळच्या व्यक्तीचे बँकेत काहीतरी काम होते, आमदाराने बँकेत पाठवले आणि बँकेत जाऊन प्रकरण मिटवण्यास सांगितले. यानंतर आमदाराच्या व्यक्तीने बँकेत जाऊन शिपायाशी बोलणे करून घेतले.
आमदाराने विनाकारण शिपायाला शिवीगाळ करून लगेच स्वतः बँक गाठल्याचे सांगितले जात आहे. बँकेचा शिपाई आणि क्लार्कला शिवीगाळ केल्यानंतर त्यांनी बेदम मारहाण केली. बँकेचे दोन्ही कर्मचारी आमदाराला आपल्या व्यक्तीचे काम काय, असे विचारत राहिले. त्याने आम्हाला ते सांगितलेही नाही. असे असतानाही आमचे नाव ऐकूनही तातडीने कामे न केल्याने दोघांनाही बेदम मारहाण करत असल्याचे आमदार म्हणाले.
बलरामपूर जिल्ह्यातील रामानुजगंज जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांसोबत आमदार बृहस्पती सिंह यांच्या मारहाणीच्या घटनेनंतर कर्मचारी चांगलेच घाबरले असून त्यांनी रामानुजगंज सोडून अंबिकापूर गाठले आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते आणि त्यांच्यामार्फत सातत्याने शेतकऱ्यांना पैसे दिले जात होते. दरम्यान, आमदाराने बँकेत पोहोचून आम्हाला बाहेर बोलावून आमच्यासोबत मारहाणीची घटना घडवून आणली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"