भोपाळ :मध्य प्रदेशमधीलकाँग्रेसचे एक आमदार स्वतःच्या सरकारविरोधात भोपाळमधील राज्य विधानसभेबाहेर आपल्या समर्थकांसह उपोषणाला बसले आहेत. निवडणुकीवेळी पक्षाने दिलेले आश्वासने सरकार आल्यावर सुद्धा पूर्ण होत नसून, आपल्या विधानसभा मतदारसंघातील कामे होत नसल्याने त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतेला असल्याचे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले.
मुन्नालाल गोयल असे या अमादारचे नाव असून ग्वालियर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे ते नेतृत्व करतात. गोयल यांनी आरोप केला आहे की, काँग्रेसने सत्तेत येण्यापूर्वी जी आश्वासने दिले होती, त्यांची प्रत्यक्षात अमलबजावणी केली जात नाही.
विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनामा प्रसिद्ध करताना झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना घरे देण्याचे आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आले होते. तर त्यांच्या मतदारसंघातील 112 लोकं हे घरांच्या दिलेल्या आश्वासनाच्या अमलबजावणीची वाट पाहत असल्याचे ते म्हणाले आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडून कोणतेही प्रतिसाद मिळाले नसल्याने आपण उपोषण करत असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे त्यांनी 6 महिन्यांपूर्वी हा मुद्दा विधानसभेतही उपस्थित केला होता. त्यावेळी लवकरच झोपडपट्टीवासीयांना घरे जाहीर केली जातील असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र ६ महिने उलटून ही काहीच होत नसल्याने त्यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे गोयल म्हणाले.