ऑनलाइन लोकमत
तिरूवनंतपुरम, दि. 22 - केरळमधील काँग्रेसचे आमदार एम. विन्सेट यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. एका महिलेनं केलेल्या तक्रारीनंतर विन्सेटविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. येथील पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्काराच्या आरोपांतर्गत काँग्रेस आमदाराला अटक करण्यात आले आहे. येथील आमदार निवासात तीन तासांहून अधिक वेळ विन्सेट यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर बेड्या ठोकण्यात आल्या.
51 वर्षीय महिलेनं केलेल्या तक्रारीच्या आधारावर विन्सेट यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. विन्सेट यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. बलरामपूरम येथील रहिवासी असलेल्या या महिलेनं विन्सेट यांनी लैंगिक छळ केल्यानंतर गेल्या आठवड्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी महिलेचं जबाब नोंदवण्यात आल्यानंतर काँग्रेस आमदार विन्सेटविरोधात बलात्कार व पाठलाग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विन्सेट यांनी बलात्काराचे आरोप फेटाळून लावले होते. माझा बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंध नसून माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.
तर दुसरीकडे, काँग्रेसमधील वरिष्ठ महिला नेत्यांनीदेखील विन्सेटने राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे असे मत मांडले. त्यामुळे अटकेनंतर विन्सेट राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी बातम्या वाचा
Kerala Cong MLA M Vincent booked on charges of rape,stalking & abetment of suicide of a 51-year-old woman, sent to 14 day judicial custody— ANI (@ANI_news) July 22, 2017