शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

एकही मंत्री कामाचा नाही, हे तर भ्रष्ट सरकार; काँग्रेस आमदाराचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 8:10 AM

भाजपानं आमिष दिल्याचा आरोप काँग्रेस आमदारानं फेटाळला

ठळक मुद्देदोनदा निवडून येऊनही पक्षानं दुर्लक्ष केलं; आमदारानं व्यक्त केली नाराजीकाँग्रेस आघाडीतले तीन आमदार अद्याप बेपत्ताकाँग्रेस सरकारला पाठिंबा देणाऱ्या बसपा आमदारही आक्रमक

भोपाळ: मध्य प्रदेशातल्या एका काँग्रेस आमदारानं विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. मंगळवार रात्री काँग्रेस आघाडीतले दहा आमदार बेपत्ता झाले होते. मात्र यातले चार आमदार कालपर्यंत परतले नव्हते. त्यातले एक आमदार हरदीप सिंग डंग यांनी काल रात्री विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांच्याकडे राजीनामा पाठवला. दोनदा जनादेश मिळूनही पक्षानं सतत दुर्लक्ष केल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'एकही मंत्री काम करायला तयार नाही. कारण ते एका भ्रष्ट सरकारचा भाग आहेत,' असं सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे. मध्य प्रदेशात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. मंगळवारी रात्री अचानक काँग्रेस आघाडीतले १० आमदार दिल्लीला रवाना झाले. त्यातले ६ आमदार माघारी परतल्याची माहिती काँग्रेसनं दिली. तर ४ आमदारांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. यापैकी सुवासरा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हरदीप सिंग डंग यांनी काल राजीनामा दिला. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सिंग यांनी आपल्याला भाजपानं ओलीस ठेवल्याचा आरोप फेटाळून लावला. भाजपानं आपल्या आमदारांना ओलीस ठेवल्याचा आणि त्यांना पैशाचं आमिष दाखवल्याचा आरोप याआधी काँग्रेसनं केला होता. आमदार हरदीप सिंग डंग यांनी त्यांचा राजीनामा विधानसभा सचिवालय आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. मात्र डंग यांचा राजीनामा आपल्याला मिळाला नसल्याचं मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितलं. सिंग यांच्यासोबत बेपत्ता झालेले तीन आमदार अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. डंग यांच्याप्रमाणेच आमदार रमाबाई यांनीदेखील भाजपानं आमिष दिल्याचा आरोप फेटाळला आहे. भाजपानं मला दिल्लीला नेलं या दाव्यात कोणतंही तथ्य नाही. मी स्वत:हून दिल्लीला गेले. माझ्या मुलीनं आधीच माझं विमान तिकीट काढलं होतं. मला मारहाण करण्यात आल्याचा आरोपही चुकीचा आहे. कोणीही मला हात लावण्याची हिंमत करू शकत नाही. मग ती काँग्रेस असो वा भाजपा, असं बसपाच्या आमदार रमाबाई यांनी सांगितलं. विधानसभेतलं पक्षीय बलाबल किती?मध्य प्रदेश विधानसभेत एकूण २३० आमदार निवडून जातात. मात्र दोन आमदारांच्या निधनामुळे सध्या विधानसभेतल्या आमदारांची संख्या २२८ आहे. कालपर्यंत विधानसभेत काँग्रेसचे ११५ आमदार होते. मात्र सिंग यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस आमदारांची संख्या ११४ झाली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या १०७ इतकी आहे. समाजवादी पार्टीच्या दोन आमदारांसह चार अपक्ष आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. यातला एक आमदार अद्याप बेपत्ता आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा