भोपाळ - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या शेतकऱ्यांकडून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या कृषी कायद्यांविरोधात आत काँग्रेसही आक्रमक झाली असून, ठिकठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. मध्य प्रदेशमध्येही रतलाम जिल्ह्यात रविवारी स्थानिक काँग्रेस आमदार हर्षविजय गहलोत यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या रॅलीनंतर काँग्रेस आमदारांनी आक्षेपार्ह विधान करत महिला एसडीएमना धमकी दिल्याचे समोर आले आहे. काँग्रेस आमदाराने दिलेल्या धमकीचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.काँग्रेस आमदार हर्ष विजय गहलोत हे या व्हिडीओमध्ये महिला एसडीएम कामिनी ठाकूर यांना धमकी देताना दिसत आहेत. तुम्ही महिला आहात. जर तुम्ही महिला नसता तर कॉलर पकडून तुमच्याकडे पत्रक दिले असते, अशी धमकी हर्ष विजय गहलोत हे देतान दिसत आहेत.रतलाम जिल्ह्यातील सैलाना मतदारसंघातील काँग्रेस आमदार हर्ष विजय गहलोत यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर रॅली काढून कृषी कायद्यांना विरोध करण्यात आला होता. मात्र या रॅलीनंतर गहलोत हे प्रशासनाला एक पत्रक देऊ इच्छित होते. मात्र महिला एसडीएम यांना हे पत्रक घेण्यासाठी बाहेर येण्यास थोडा वेळ लागलाय त्यामुळे आमदार महोदय संतापले. तसेच तुम्ही महिला नसता तर कॉलर पकडून तुमच्याकडे पत्रत दिले असते, अशी धमकी दिली.
काँग्रेस आमदाराची महिला एसडीएमला खुलेआम धमकी; म्हणाले, महिला नसता तर...
By बाळकृष्ण परब | Published: January 18, 2021 3:02 PM