ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. ६ - डंम्पर आंदोलन प्रकरणात अटक झालेले काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राणे यांच्यासह ३८ कार्यकर्त्यांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा प्रशासनाने घातलेल्या जाचक अटींविरोधात डंपर-चालक मालक संघटनेमार्फत शुक्रवारपासून सुरु असलेल्या आंदोलनाला शनिवारी हिंसक वळण लागले.
जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून तोडफोड केल्या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा आमदार नीतेश राणे , जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह २५ जणांना अटक करण्यात आली.
दरम्यान यापुढे आंदोलनाची जबाबदारी आपण घेणार असल्याचे रविवारी नारायण राणे यांनी जाहीर केले. यापुढील आंदोलनाची जबाबदारी माझी असेल. भूमिका उद्या जाहीर करेन असे कणकवलीत नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या जाचक अटींमुळे डम्पर चालक-मालक त्रस्त असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला.