हरदाचे काँग्रेस आमदार राम किशोर दोगने हे खोट्या सुतळी बॉम्बचा हार घालून विधानसभेत पोहोचले. फटाक्यांच्या फॅक्ट्रीत झालेल्या स्फोटाबाबत विरोधी पक्षाच्या आमदारांनी गांधी पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. 4 लाखांची भरपाई आणि कलेक्टर एसपी यांना हटवून काहीही होणार नाही, असं म्हटलं आहे. हरदा येथील स्फोटानंतर राज्य सरकारने जिल्हाधिकारी ऋषी गर्ग यांना हटवलं आहे.
एसपी संजीव कुमार कांचन यांना हटवून भोपाळ मुख्यालयात पाठवण्यात आलं आहे. विधानसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही हरदा स्फोटाचा मुद्दा सभागृहात गाजणार आहे. विरोधी पक्षाने यासाठी पूर्ण तयारी केली आहे. याच रणनीतीअंतर्गत आज विधानसभेत पोहोचलेल्या हरदा येथील काँग्रेस आमदाराने अनोख्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे आमदार दोगने यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. यामुळे जनजीवन उद्ध्वस्त झालं आहे. सरकारने संवेदनशीलता दाखवावी. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बुधवारी हरदा येथील जिल्हा रूग्णालयात पोहोचून फटाक्यांच्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची भेट घेऊन त्यांची प्रकृती जाणून घेतली. अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना रुग्णालय व्यवस्थापनाला दिल्या.
अपघातात त्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं जखमींनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांना सांगितलं. गुरांचाही मृत्यू झाला आहे. यादव यांनी हरदा जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त घरांची यादी करून बाधित कुटुंबांना घरं उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. जखमी गुरांवर चांगले उपचार केले जातील, असं त्यांनी सांगितलं.