...अन् काँग्रेस आमदाराला राग अनावर झाला, सुपरवायझरला थेट चपलेने केली मारहाण, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 06:16 PM2022-06-02T18:16:43+5:302022-06-02T18:20:10+5:30

Congress MLA Veer Singh Bhuria : थांदलाचे आमदार वीर सिंह भुरिया तिथे उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला चपलेने मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

congress mla Veer Singh Bhuria beat supervisor with slippers video went viral | ...अन् काँग्रेस आमदाराला राग अनावर झाला, सुपरवायझरला थेट चपलेने केली मारहाण, Video व्हायरल

फोटो - सोशल मीडिया

Next

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील थांदला येथील काँग्रेस आमदार वीर सिंह भुरिया (Congress MLA Veer Singh Bhuria) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आमदार सुपरवायझरला चपलेने मारहाण करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नळ जल योजनेंतर्गत बांधण्यात येत असलेल्या टाकीच्या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार आले होते, त्यावेळी टाकी बनवताना वापरण्यात येत असलेल्या साहित्याचा दर्जा पाहून संतापले आणि रागाच्या भरात त्यांनी सुपरवायझरला मारहाण करण्यास सुरुवात केली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ लांबून हा प्रकार पाहणाऱ्या एका व्यक्तीने काढला आहे. व्हिडीओमध्ये पाण्याच्या टाकीजवळ जेसीबी फिरताना दिसत आहे. तर काही लोक तिथे उभे असलेले दिसतात. थांदलाचे आमदार वीर सिंह भुरिया तिथे उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला चपलेने मारहाण करत असल्याचं दिसत आहे. तिथे उभा असलेला आणखी एक व्यक्ती त्यांना थांबवताना दिसत आहे पण आमदार थांबण्याचे नाव घेत नाहीत. ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. 

वीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नळ जल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामात कोट्यवधी रुपयांचा गैरवापर होत आहे. आदिवासी भागातील रस्ते खोदल्यानंतर कंत्राटदाराने त्यांना तसेच सोडले आहे. पाण्याची एकही टाकी अद्याप सुरू झालेली नाही. याप्रकरणी चौकशीसाठी तयार असल्याचेही आमदारांनी सांगितले. त्यांच्याकडे ठेकेदाराचे काही व्हिडिओही आहेत. मात्र, सुपरवायझरशी केलेल्या गैरवर्तणुकीबाबत प्रश्न विचारताच त्यांनी फोन बंद केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: congress mla Veer Singh Bhuria beat supervisor with slippers video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.