काँग्रेस आमदाराचे जय श्री राम, मंदिर उभारणीसाठी 51 लाखांचं योग'दान'
By महेश गलांडे | Published: February 10, 2021 01:03 PM2021-02-10T13:03:33+5:302021-02-10T13:17:14+5:30
माझे सर्व सहकारी आणि टीममधील सदस्यांच्या वतीने मी ही देणगी विश्व हिंदू परिषदेला (VHP) देत आहे. यासाठी सर्वांनीच योगदान दिले आहे,’’ असे अदिती यांनी म्हटले.
रायबरेली - पंतप्रधान नरेद्र मोदींनी अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचे भूमिपूजन केल्यानंतर आता जगभरातून या भव्य दिव्य मंदिरासाठी देगणी जमा करण्यात येत आहे. अयोध्येतील या मंदिरासाठी केवळ भाजपाच नाही, तर अनेक पक्षांचे नेते स्वशुखीने देणगी देत आहेत. आता, बंडखोर काँग्रेस नेत्या आणि आमदार अदिती सिंह (Rebel Congress MLA Aditi Singh) यांनी अयोध्येतील ( Ayodhya) राम मंदिरासाठी (Ram Temple) देणगी दिली आहे. राम जन्मभूमी मंदिर निर्माण ट्रस्टचे सचिव चंपत राय यांना आपल्या समर्थकांकडून गोळा केलेला 51 लाख रुपयांचा चेक सोपवला आहे. याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी माहिती दिली.
माझे सर्व सहकारी आणि टीममधील सदस्यांच्या वतीने मी ही देणगी विश्व हिंदू परिषदेला (VHP) देत आहे. यासाठी सर्वांनीच योगदान दिले आहे,’’ असे अदिती यांनी म्हटले. “आपले वडील आज असते तर त्यांना हा कार्यक्रम पाहून खूप आनंद झाला असता. पक्षाचा विचार न करता या कार्यक्रमाचं पावित्र्य सर्वांनी जपलं पाहिजे ’’, असं आवाहनही त्यांनी केलं. अदिती सिंह या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या मतदरासंघातील आमदार आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांच्यावर जिल्ह्यातील नागरिकांना न भेटल्याबद्दलह त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
By the grace of the Almighty my team and I contributed a sum of 51,00,000 for the construction of our Ram Mandir. I thank Champat Rai ji for sparing valuable time and coming down to Raebareli. सियावर रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय। 🙏🏼 pic.twitter.com/A95TPkaWD7
— Aditi Singh (@AditiSinghRBL) February 9, 2021
अयोध्येतील राम मंदिरासाठी संघ परिवाराच्या वतीने मकर संक्रातीपासून देशव्यापी निधी संकलन अभियान राबवले जात आहे. माघ पौर्णिमा म्हणजेच 27 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान चालणार आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी आतापर्यंत 600 कोटींपेक्षा जास्त निधी जमा झाला आहे. राम मंदिर उभारणीला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून विदेशातूनही भारतीय नागरिक निधी देत आहेत.
प्रभू श्रीराम सर्वांचेच
"प्रभू श्रीराम हे संपूर्ण जगाचे राम आहेत. जर ते संपूर्ण जगाचे राम आहेत तर ते आपल्या सर्वांचे राम आहेत. कुराण फक्त आमचं नाही, सर्वांचं आहे. जर तुम्ही कोणती चूक केली तर आम्ही ती बरोबर करू आणि आम्ही काही चूक केली तर ती तुम्ही बरोबर कराल. असाच देश चालतो," असं फारुख अब्दुल्ला म्हणाले.