लखनऊ:उत्तर प्रदेशमधीलकाँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांनी राज्य सरकारकडे एक विचित्र मागणी केली आहे. विधान परिषदेचे आमदार असलेल्या दीपक सिंह यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे अधिकृत निवासस्थानी चूल पेटवून स्वयंपाक करण्याची मागणी केली आहे.
विभागाच्या प्रभारींना लिहिलेल्या पत्रात दीपक सिंह म्हणतात की, 2024 पूर्वी एलपीजीच्या वाढीव किंमतीपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. आणि एलपीजी सिलेंडरच्या किंमतीच्या तुलनेत लाकूड आणि कोळसा स्वस्त आहे. त्यामुळे मला दिलेल्या सरकारी निवासस्थानात चूल पेटवून स्पयंपाक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दीपक सिंह पुढे म्हणाले की, महिन्यात दोन वेळा 975 रुपयांचे सिलेंडर घ्यावे लागते. याउलट फक्त 500 रुपये महिना खर्च करुन चुलीवर स्वयंपाक होतो. माझ्यासह इतर काही आमदारांनाही आपल्या निवासस्थानी चुल पेटवायची आहे, त्यांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.