इम्फाळ : चार मंत्र्यांसह भाजपप्रणीत आघाडीच्या नऊ सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर मणिपुरात वेगाने राजकीय घडामोडी घडत असून, काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस लवकरच एन. बिरेन सिंह सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणणार आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते ओ. इबोबी सिंह यांनी सांगितले.विधानसभेचा राजीनामा देणारे तीन भाजप आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी भाजपप्रणीत आघाडी सरकारचा राजीनामा दिलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या चार मंत्र्यांशी संपर्क साधण्यात आला आहे, असे इबोबी सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.आम्हाला आणि आमच्या पक्षाला योग्य वागणूक न दिल्याने सरकारचा राजीनामा दिल्याचे चार मंत्र्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री इबोबी सिंह यांनी सांगितले की, राज्य सरकारविरुद्ध काँग्रेस अविश्वास ठराव आणणार असून, विधानसभेचे विशेष अधिवेशन लवकर बोलाविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष युमनाम खेमचंद सिंह यांची मी भेट घेणार आहे. दरम्यान, काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष वाय. खेमचंद यांंना हटवण्यासाठी नोटीस दिली आहे.सापत्न वागणुकीमुळे मी अािण एनपीपीच्या तीन सहकाऱ्यांनी मणिपूरमधील भाजपप्रणीत आघाडी सरकारचा राजीनामा दिला, असे माजी उपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार यांनी सांगितले. नवीन सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देणार का? यावर ते म्हणाले की, आम्ही हा पर्याय पडताळून पाहणार असून, अविश्वास ठराव मांडल्यानंतर आम्ही निश्चितच सरकार स्थापन करू.१९ जून रोजी मणिपूरमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होणार असताना या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजप आणि काँग्रेसने राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी उमेदवार दिले आहेत.विधानसभेत असे आहे संख्याबळउपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार सिंह, आदिवासी आणि पर्वतीय क्षेत्र विकासमंत्री एन. कायिशी, युवक कल्याणमंत्री लेतपाओ हाओकीप आणि आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री एल. जयंत कुमार सिंह यांनी बुधवारी मंत्रीपदाचे राजीनामा दिले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या एका आमदाराने आणि एका अपक्ष आमदारानेही सरकारचा पाठिंबा काढला आहे.विरोधकांचे संख्याबळ २९२० काँग्रेस, ४ एनपीपी, ३ भाजप आणि तृणमूल काँग्रेस आणि एक अपक्ष आमदाराचा समावेश आहे.बिरेन सिंह यांच्या मागे २३१८ भाजप , ४ एनपीएफ, एक लोजपा जणांचे पाठबळ आहे.
'या' राज्यात कमळ कोमेजण्याची शक्यता; सत्ता जाणार काँग्रेसच्या 'हाता'त?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 1:37 AM